पंढरपूर (प्रतिनीधी) - कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी सत्तेचा गैरवापर करत सभासद व कामगारावर दबावाचे राजकारण केले आहे हे दबावाचे राजकारण उलथवून टाकण्यासाठी आपण सर्व विरोधकांना बरोबर घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहोत असे ॲड दिपक पवार यांनी सांगितले आहे.
पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे. आज बुधवार रोजी ॲड. दिपक पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की- कारखान्यातील भ्रष्ट कारभार संचालक मंडळ चेअरमन यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवावी सभासद शेतकरी यांना सहकार्य करावे निवडणुकिसाठी लागणारे कायदेशीर कागदपत्राची पूर्तता करून विद्यमान संचालक मंडळाने निवडणूक लढवू पाहणाऱ्या शेतकरी सभासदांना सहकार्य करावे आजपर्यंत त्यांनी दबावाचे राजकारण केले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी , कामगारांच्या हितासाठी कोणताच निर्णय त्यांनी घेतला नाही उलट जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा दर कमी देण्यात आला प्रत्येक वेळी बिलासाठी झगडावे लागले कारखान्याच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवल्यास सभासदत्व रद्द करण्यापर्यंत तसेच विविध मार्गाने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न विद्यमान संचालक व चेअरमने यांनी केला असा आरोप ॲड. दीपक पवार यांनी केला आहे.