स्किलथॉन 2023 स्पर्धेत वसंतराव काळे आयटीआय कॉलेजचा द्वितीय क्रमांक

0
     पंढरपूर (प्रतिनिधी) -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, इनक्युबेशन सेंटर , कौशल्य विकास विभाग, जिल्हा कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण आयोजित स्किलथॉन2023 स्पर्धेमध्ये वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने द्वितीय क्रमांक मिळवून  घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ गौतम कांबळे , जिल्हा कौशल्य रोजगार केंद्राचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव , व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक शिवानंद चिलवंत, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ प्रभाकर कोळेकर ,  इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना आयटीआय कॉलेजचे प्राचार्य  संतोष गुळवे , निदेशक नितीन डोंगरे ,संतोष सुरवसे त्यांनी पारितोषिक व ट्रॉफी स्वीकारली या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे , उपाध्यक्ष बाळासाहेब काळे , सचिव चंद्रकांत कुंभार ,संस्थेचे सदस्य समाधान दादा काळे, विलाससराव काळे , वसंतराव काळे प्रशालेचे मुख्याध्यापक दादासाहेब खरात, मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार दुपडे, रायझिंग स्टार च्या प्राचार्य गीतांजली खाडे यांनी  सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी व निदेशक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 *टू व्हीलरच्या इंजिनपासून अवघ्या 35 हजारात कार*                                                                               
           चक्क टू व्हीलर चे इंजिन वापरून शेतीपूरक उपयुक्त कारची निर्मिती वसंतराव काळे आयटीआय चे निदेशक नितीन डोंगरे प्रशिक्षणार्थी ऋषिकेश सप्ताळ यांनी बनवले आहे. ते म्हणाले मिनी कार अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या  शेतीतील  कामासाठी त्याचबरोबर खते भाजी दूध वाहतुकही या कारद्वारे करता येईल. शेतमाल विक्रीस नेण्यासाठी शेतकऱ्यांना ही कार उपयुक्त आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)