पुणे - राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण 10 टक्के इतक्या विद्यार्थ्यांसाठी, शासनाच्या निकषानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त आर्थिक दुर्बल किंवा अन्य निकषांच्या आधारे उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सूट द्यावयाची असल्यास त्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यापीठाच्या स्तरावर घेण्यात येईल. ही सवलत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यापासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
यासंदर्भात खासगी विद्यापीठास शासनाकडून कोणतेही अनुदान किंवा इतर वित्तीय सहाय्य मिळणार नाही असे सदर निर्णयाच्या जारी करण्यात आलेल्या शासन आदेशामध्ये सांगण्यात आले आहे.
सोशल रे मीडियाच्या माध्यमातून पाटील यांनी हा शासन आदेश शेअर केला असून अनेक विद्यार्थांना यामुळे मदत मिळणार आहे.