बुधवारी कोर्टी येथून होणार प्रचारास शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनीधी) - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी काळे गटाकडून जवळपास 90 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधून 21 उमेदवार निवडण्यात आले. यामधून संस्था मतदार संघातून मालनबाई वसंतराव काळे या बिनविरोध झाल्याने पहिली विजयाची सलामी मिळाली आहे. या उर्वरित 20 उमेदवारामधून विद्यमान संचालक व्यतिरिक्त 9 नव्या उमेदवारांना संधी दिली असून यामध्ये तरुण वर्गाचा समावेश आहे. अशी माहिती चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली आहे.
या निवडणुकीत भगीरथ भालके, युवराज पाटील, ऍड गणेश पाटील हे आपल्या सोबत असल्याने यांच्या प्रमुख उपस्थितीत पॅनलचा प्रचार शुभारंभ बुधवार 7 जून रोजी सकाळी 8:30 वाजता कोर्टी येथील शंभू महादेवाला नारळ फोडून करण्यात येणार आहे असेही काळे यांनी सांगितले. ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे त्यापैकी कोणीही नाराज नसून केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण माघार घेत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे कोणीही नाराज नसल्याचेही काळे यांनी आवर्जुन सांगीतले.
सत्ताधारी सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनल कडून पुढील प्रमाणे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाळवणी गटातून गोरख हरिबा जाधव (पळशी), युवराज छगन दगडे (करोळे), सुनिल वामन सराटे (भाळवणी). भंडीशेगांव गटातुन कल्याणराव वसंतराव काळे (वाडीकुरोली), परमेश्वर हरिदास लामकाने (पिराचीकुरोली), अमोल नवनाथ माने (नेमतवाडी). गादेगांव गटातून मोहन वसंत नागटिळक (कौठळी), दिनकर नारायण कदम (रोपळे), नागेश एकनाथ फाटे (गादेगांव)., कासेगांव गटातून योगेश दगडू ताड (एकलासपूर), तानाजीराव उमराव ऊर्फ रावसाहेब सरदार (तावशी), जयसिंह बाळासाहेब देशमुख (कासेगांव), सरकोली गटातून आण्णा गोरख शिंदे (आंबे), संतोषकुमार शिवाजी भोसले (सरकोली), राजाराम खासेराव पाटील (खरसोळी), संस्था मतदार संघातून मालनबाई वसंतराव काळे या बिनविरोध निवडुन आल्या आहेत. महिला राखीव गटातून संगिता सुरेश देठे (धोंडेवाडी), उषाताई राजाराम माने (भंडीशेगांव). अनुसुचित जाती जमाती मधुन राजेंद्र भगवान शिंदे. इतर मागास वर्गीय प्रवर्गातून अरुण नामदेव नलवडे.भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातुन भारत सोपान कोळेकर हे उमेदवार निवडण्यात आले आहे. सर्व उमेदवार सक्षम असून सभासदांचा पाठींबा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्ही मोठया फरकाने विजयी होणार असल्याची ग्वाहीही काळे यांनी दिली आहे.