पंढरपूर (प्रतिनिधी) -येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रम्हवृंद संस्थेची मासिक सभा श्रीयाज्ञवल्क्य आश्रमात आज नूतन अध्यक्ष श्री. जयंत पुराणिक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेमध्ये स्वीकृत संचालकपदी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री. गजाननराव बिडकर यांची निवड करण्यात आली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदांचीही निवड यावेळी करण्यात आली.
नूतन संचालक मंडळ
वर्ष - 2023 ते 2028
अध्यक्ष - श्री. जयंत पुराणिक
उपाध्यक्ष - श्री. श्रीकांत बरसावडे
कार्याध्यक्ष - श्री. गजानन बिडकर
चिटणीस - श्री. रामचंद्र (अनिल) हरिदास
अंतर्गत लेखापाल - श्री. बाळकृष्ण धाराशिवकर
रोखपाल - श्री. सुरेश कुलकर्णी
सदस्य - सर्वश्री. प्रकाश विठ्ठलबुवा देवडीकर, अरुण ज्ञानेश्वर पुरंदरे, उन्मेश पुरुषोत्तम आटपाडीकर, प्रशांत दिलीप जोशी, अनंत वासुदेवराव कुलकर्णी (गिरवीकर).
या मासिक सभेमध्ये संत सोपान मासिकाचे संपादक मंडळ, संचालक मंडळ उपस्थित होते. सभेची सुरुवात श्रीयाज्ञवल्क्य स्तवनाने झाली तर सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.