पिराची कूरोलीच्या सभासदानी काळे यांच्या दारात येऊन ताकद दाखविली

3 minute read
0
संचालक कौलगे यांचा पाटील गटातील प्रवेश फुसका बार

पंढरपूर (प्रतिनीधी) - मागील काही दिवसापूर्वी सहकार शिरोमणीचे संचालक बाळासाहेब कौलगे यांनी उपरी येथील बैठकीमध्ये चक्क चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याची धक्कादायक गोष्ट पहावयास मिळाली . हा झालेला प्रवेश निव्वळ फुसका बार आहे. हे दाखऊन देण्यासाठी चक्क पिराची कुरोली गावातील शेकड़ो मतदार सभासद यांनी चेअरमन काळे यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी येऊन, आम्ही अजूनही तुमच्याच पाठीशी आहोत. हे दाखऊन देण्यासाठी मोठ शक्ती प्रदर्शन दाखविले आहे. यामुळे या गावातील मागील अनेक वर्षातील काळे घराण्याचे संबंध कायम असल्याचेच दाखऊन दिले आहे.

स्व. वसंतदादा काळे यांच्या राजकीय कारकीर्द पासून पिराची कुरोली या गावावर विशेष प्रेम आहे. या गावाने आजवर काळे यांच्या शब्दाला मोठी किंमत दिली आहे. तीच परंपरा आजवर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिराची कुरोली येथील मतदार सभासद यांनी स्वखर्चाने ४० चारचाकी वाहनाच्या ताफ्यामधून शेकडो सभासद यानी अचानक चेअरमन काळे यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी येऊन पाठिंबा देण्याची बैठक घेतली. त्यामुळे काळे कुटुंब भारावून गेले.

संचालक बाळासाहेब कौलगे यांनी जो पाटील गटात प्रवेश केला आहे. तो आम्हाला मान्य नसल्याचा खुलासाही अनेक उपस्थित सभासद यांनी व्यक्त केला.  त्यांना गावातील किती सभासद स्वीकारतील हे मतमोजणी दिवशी नक्की समजणार आहे. त्यामुळे त्यांनी केलेली चूक महागात पडणार असल्याचेही गावातील सभासद यांनी व्यक्त केले आहे.

     यावेळी झालेल्या या बैठकीत चेअरमन काळे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले. जे लोक सद्या अमिषाला बळी पडून आम्हाला सोडून गेल्याचे दिसत आहे.ते लोक मागील अनेक दिवसापासून आमच्यापासून फटकून वागत होते. त्याची पुरेपूर जाणीव होत असतानाही आपण त्यांना याबाबत बोललो नाही. त्यांची खरी चुळबुळ ही विठ्ठल सह साखर कारखाना निवडणुकीत जाणवली होती. त्यामुळे ते गेल्याचा कसलाही धक्का वगैरे आम्हाला बसणार नसल्याचे आवर्जून काळे यांनी सांगितले.

यावेळी संचालक सुधाकर कवडे यांनी अनेक विरोधकांवर टीका केली. त्यांना जुने कारखाने फुकटात घ्यायची सवय लागली आहे. त्यांना नवीन कारखाने उभारणी करताना होणाऱ्या यातना काय असतात. याची कल्पना नाही. केवळ जुन्या कारखान्यावर डोळा ठेऊन वाटेल ती आमिष दाखऊन फोडाफोडी करण्याचे कारस्थान केले जात आहे. यामध्ये केवळ काही स्वार्थी नेते हाताला लागतील परंतु सभासद मात्र याला भुलनार नसल्याचेही कवडे यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये पिराची कुरोली येथील खरा मतदार सभासद यांनी वेगळाच पायंडा राबविला.यामध्ये कोणत्याही निवडणुकीत नेते मते मागण्यासाठी गावात जाऊन हात जोडतात. मात्र या मतदार सभासदांनी तर सर्व गावातील सभासद यांनी नेते असलेले काळे यांच्या निवासस्थानी जाऊन आमचा गावाचा एकमुखी पाठिंबा असल्याचे दाखऊन दिले. जर गावातील मतदार येऊन पाठिंबा देत असतील तर संचालक बाळासाहेब कौलगे यांनी पाटील गटात केलेला प्रवेश मात्र फुसका बार ठरणार आहे. हे मात्र उपस्थित सभासद यांच्या भूमिकेमुळे सिद्ध झाले आहे.

यावेळी परमेश्वर लामकाने, रामचंद कौलगे, पांडूरंग कौलगे, चेअरमन पांडूरंग कौलगे, माऊली कौलगे, गणेश शिंदे, तुकाराम माने,सतिष कौलगे, नामदेव कौलगे, बाळासाहेब लामकाने, बापू लामकाने, मोहन सोनवले, अरुण सोनवले, बबन नाईकनवरे, दिनेश कौलगे, शहाजी कौलगे, शाहीद मुजावर, ज्ञानेश्वर सावंत, संताजी कौलगे, विकास रामगुडे,अतुल माने, रघुनाथ माने, नंदकुमार भुई, सुरेश भुई, हणमंत लामकाने, तुकाराम कौलगे,मारूती कौलगे, आगतराव काळे, मारुती काळे, सुनिल कौलगे, ज्ञानेश्वर खर्चे, विजय ढवळे, पांडूरंग ढवळे, बाळासाहेब कौलगे, कपिल देशमुख, देशमुख भाऊ, पांडूरंग मा.कौलगे यांचेसह पिराची कुरोली येथील शेकडो सभासद उपस्थित होते.

शनिवारी उपरी येथे उत्तर सभा
सहकार शिरोमणी च्या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील गटामध्ये उपरी येथील काही संचालकांनी प्रवेश केले होते. त्याच ठिकाणी चेअरमन कल्याणराव यांची शनिवार दि.3 जुन रोजी सायं. 6 वाजता भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी उत्तर देण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)