गुरू+शिष्य कृतज्ञता मेळावा

0
०  चैतन्य विद्यालयात  व श्री. सु. गो. दंडवते कनिष्ठ महा.नीरानरसिंहपूर आठवणीत  रमले सन 1999-2000 बॅचचे  विद्यार्थी....
०  माजी विद्यार्थी मेळावा....

नीरानरसिंहपूर  (प्रतिनिधी)- येथील नामवंत चैतन्य विद्यालयात जुन्या इ.10 वी (तु."ब") च्या 1999-2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्य कृतज्ञता मेळाव्याचेआयोजन केले होते.
 मार्च -2000 च्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनींनी स्नेह मेळावा छान झाला..आलेले 38 मुले व मुली यांनीजुन्या आठवणीनांना ..स्मृतींना,..ती शाळा,..तो वर्ग,..सुंदर कौलारू निरा नदी काठची इमारत,..चिंचेंचे बन असणारे मैदान,.. शिकवणारे विषय शिक्षक,.. क्रिडा शिक्षक,.. वर्गशिक्षक श्रीयुत कदमसर मुख्याध्यापक, श्रीयुत कोरांटकसर त्या वेळचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत मनोहर सुरू सर (काका).. संस्थेचे कार्यवाह व आजचे प्रमुख पाहुणे श्रीयुत प्रकाश सुरू सर (विश्वस्त लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट,.शि.प्र.मंडळ जेष्ठ  सदस्य मार्गदर्शक,..अध्यक्ष विकास सार्व.वाचनालय)  आठवणीनींना उजाळा दिला..सर्व जण 22 वर्षानंतर भेटले होते..सर्व जण ओळखणे व आरे-तुरेतुन गप्पा मारणे हा अविस्मरणीय व आनंदाचाभाग होता.
सर्व जण 35 ते 36 वयाचे यशस्वी पालक होते ..शेती,..व्यावसाय उद्योग,.. नोकरी,.. ठेकेदारी,.. दुग्धव्यवसाय,.. राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी,.. सामाजिक कार्यकर्ते,.. शिक्षक,.. बँकेतील नोकरी,.. धार्मीक कार्यक्रमात सहभागी होणारे आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेणारे माजी विद्यार्थी एकत्र आले होते..
    स्नेह मेळाव्याची सुरवात प्रथमत: बेल देऊन सर्व माजी विद्यार्थी वर्गात एकत्र आले.  त्यांनी राष्ट्रगीत (जन-गण)  व सरस्वती स्तोत्र सामुहीक गायीले तसेच सरस्वतीच्या फोटोचे पुजन केले.  माजी विद्यार्थी तात्यासो कांबळे यांनी सुविचार सांगीतला. इ.10वी चे सन 1999-2000 चे वर्गशिक्षक श्रीयुत रामदास कदम सर यांनी हजेरी घेतली गैरहजर विद्यार्थ्यींची चौकशी केली. कालचा अभ्यास पुर्ण केला का??..विचारणा केली तसेच हजेरी घेताना विद्यार्थांना आनंद होत होता; आपण इ.10 वी लाच आहौत असे वाटत होते..सर्व जण आनंदात आठवणीत हास्यात बुडाले होते.!...
 विशेष म्हणजे सन 1999-2000च्या विद्यार्थी बॅचेने चैतन्य विद्यालयास कंपाऊड होते त्याला मोठे लोखंडी गेट (प्रवेश द्वार लोखंडि) बसवुन दिले आहे.. खरंच फार मोठी आणि उपयुक्त गरज असलेली वस्ती रुपात देणगी दिली..त्यांचे उद् घाटन प्रमुख पाहुणे श्री.प्रकाश सुरु सर व सर्व सेवानिवृत्त शिक्षक,.. मुख्याध्यापक श्रीयुत धनंजय दुनाखे (माजी मेळावा कार्यक्रमांचे अध्यक्ष) श्रीयुत श्री.गोरख लोखंडेसर (प्राचार्य चैतन्य विद्यालय व श्री.सु.गो.दंडवते कनिष्ठ महा.) ..शि.प्र.मंडळ खजिनदार श्रीयुत मगनशेठ क्षीरसागर,.. शि.प्र.मंडळ जेष्ठ सदस्य  श्रीयुत प्रशांत दंडवते,.. शि.प्र मंडळ सदस्य शामराज दंडवते सामाजिक कार्यकर्ते व अध्यात्मक मंडळचे डाॅ.अरूण वैद्य .सर्व शिक्षक..शिक्षकेत्तर,..माजी विद्यार्थी ,.परिवार उपस्थित होते..
..या नंतर सर्व माजी विद्यार्थी यांनी  संस्थेचे पदाधिकारी ,..सेवानिवृत्त शिक्षक,..शिक्षकेत्तर शाळेचा सर्व स्टाॅफ यांचेवर पुष्पवृष्टी व फुलांची चादर अंथरली होती..तसेच सर्वाचे आरतीने ओवाळुन स्वागत केले.
...कार्यक्रमास संस्थेचे सदस्य व माजी मुख्याध्यापक श्री.धनंजय दुनाखे सर यांनी अध्यक्षस्थान भुषवले.पुण्यश्वोक अहिल्याबाई होळकर व सरस्वतीचे प्रतिमांचे पुजन केले .. सर्व सन्माननीय गुरूजन,..पदाधिकारी सर्व चैतन्य विद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंद .यांचा  शाल ,श्रीफळ, पुप्षहार,.गुलाब फुल,..देऊन सत्कार केला..सर्व माजी विद्यार्थी यांनी ओळख करून दिली त्या मध्ये नांव,.शिक्षण..फॅमीली माहीती मुलांची शिक्षण व व्यवसाय किंवा उद्योग नोकरी,..शेती यांची माहीती दिली..यानंतर माजी विद्यार्थीनी भारती मस्के,..शुभांगी मस्के,..चमेली रानमाळ, शिंदे..रविंद्र मस्के,..परमेश्वर भोई,..संतोष इंगळे,..गणेश ताटे देशमुख,..सुनिल पराडे,..नानासाहेब पवार या माजी विद्यार्थी यांनी गुरूजनांबद्दल कृतज्ञता,.. शाळेच्या जुन्या आठवणी विषयशिक्षकांचे कौतुक केले चैतन्य विद्यालयामुळे आणि तत्कालीन गुरूजनामुळे आम्ही घडलो..ज्ञान,.विज्ञान,..सुसंस्कार  मिळाले..जगाच्या व्यावहारामध्ये आम्ही टिकलो.!!मातृ देवो. भव! पितृ देवो भव.!!आचार्य देवो भव.!!! हा संस्कार दिला.. 
सेवानिवृत्तशिक्षक श्रीयुत खंडाळेसर,.. श्री.पवारसर,.. श्री.कदमसर,.. श्री.सय्यद सर,. मुख्याध्यापक श्रीयुत गोरख लोखंडेसर,..प्रमुख पाहुणे श्रीयुत प्रकाश सुरू सर यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले व भावी आयुष्याच्या पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या व सुशिक्षीत,.साक्षर होऊन तुमच्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊन समाजाप्रती बांधीलकी बाळगांवी हा संदेश दिला.!..अध्यक्षीय मनोगतातुन श्री.धनंजय दुनाखे यांनी आई -वडील-गुरूजन यांचा सन्मान करा,..आदर्श नागरीक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडा तसेच या शाळेसाठी लोखंडी गेट बसवून फार मोठे योगदान दिले आहे त्यांचे आभार मानले ..भावी आयुष्यात माझी शाळा आहे म्हणून सहकार्य करा.!! "शाळा ही सुखाची सरीता ज्ञानांची अखंड गंगा ,.भाग्याची देवता व स्मृतीची ठेव आहे"..असे समजून जुन्या स्मतींना 22 वर्षानंतर उजाळा दिला.!.. कार्यक्रमाचे आभार माजी विद्यार्थी श्री.तात्यासो कांबळे यांनी मानले सुत्रसंचालन संतोष इंगळे,..परमेश्वर भोई यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गणेश ताटे,..परमेश्वर भोई,..भारती मस्के,..शुभांगी मस्के,..सुनील पराडे,..तात्यासो कांबळे,..संतोष इंगळे ..कृष्णा बनसोडे,.. भारत इंगळे,..प्रशांत कुलकर्णी,..निळकंठ दळवी.. शरद मस्के,..रविंद्र मस्के यांनी सहकार्य व कष्ट घेतले.!..
हा दैदीप्यमान सोहळा आनंदात,..जुन्या आठवणी व 22 वर्षेपुर्वी स्मृतीना उजाळा देत संपन्न झाला..!

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)