मनसेने घेतली नदी स्वच्छता मोहीम हाती

0
मनसे व वारकरी  मंडळींच्या वतीने चंद्रभागा नदी स्वच्छता मोहीम..

पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी यात्रा तोंडावर येऊन ठेवली आहे. पंढरीनाथ जमत आहे.  आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक येणार आहेत. सर्व भाविक चंद्रभागा नदी पत्रात आंघोळीसाठी येतात, आणि माता चंद्रभागेचे तीर्थ प्राशन करत असतात. या तीर्थ प्राशनाने सर्व रोगराई दूर होते असे सर्व भक्तांच्या मनात असते.
     परंतु नदीपात्र अतिशय अस्वच्छ  असल्याने शहरातील चंद्रभागा भागा नदीच्या वाळवंटातील  स्वच्छता मोहीम सोलापूर जिल्हा वारकरी शिक्षण संघटना  आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पुंडलिक मंदिराजवळील चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, वारकरी शिक्षण संघटना अध्यक्ष जोगदंड महाराज, हसन महाराज, प्रभाकर वाकचौरे महाराज, पवार महाराज, मनसे व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भाऊ भोसले, शहर अध्यक्ष संतोष कवडे, उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले ,आकाश धोत्रे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप भोसले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)