श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विनामुल्य सेवा देण्यासाठी इच्छुक भाविकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत – कार्यकारी अधिकारी श्री.तुषार ठोंबर

0
पंढरपूर (प्रतिनिधी) :- श्रीसंत गजानन महाराज देवस्थान, शेगांवच्या धर्तीवर भाविकांना श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरमध्ये विनामुल्य सेवा करण्याबाबत अनेक भाविकांकडून मागणी होत आहे, अशा सेवाभावी भाविकांना मंदिरात व इतर इमारतीमध्ये स्वच्छता करणे, दर्शनरांग द्रुतगतीने चालविणे, भोजनप्रसाद वाटप करणे, गोशाळेत स्वच्छता करणे, महावस्त्रांची विगतवारी करणे, दान-देणगीची विगतवारी करणे व इतर अनुषंगीक विनामुल्य सेवा करण्याची संधी देण्यासाठी "विठ्ठल सेवक" योजना राबविण्याचा ठराव दि.20/04/2023 रोजीच्या सभेत पारीत करण्यात आला होता.
  या योजनेमध्ये 07 व्यक्तीचा 01 गट तयार करण्यात आला असून, रविवार ते शनिवार 01 गट काम करेल असे एका आठवड्यात सकाळी 6.00 ते दुपारी 2.00 व दुपारी 2.00 ते रात्री 10.00 व रात्री 10.00 ते सकाळी 6.00 यावेळेत आठवडाभर सेवा देतील. तसेच एका सेवकांला एकापेक्षा अधिक गटांमध्ये नोंदणी करता येणार आहे. अशा गटांना मंदिर समितीच्या विविध ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून काही गटांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा सेवेची इच्छा असेल तर त्यांना वर्षातून एका पेक्षा जास्त वेळेस सलग 07 दिवस सेवेची संधी देण्यात येणार आहे. या गटांना प्रथम गोशाळा, भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शनरांगेतील स्वच्छता, दर्शनरांग द्रुतगतीने चालविणे, परिवार देवता मंदिरे व इतर अनुषंगीक ठिकाणी वर्षातून सलग 7 दिवस सेवेची संधी दिली जाईल. तसेच या सेवकांची भोजन व निवास व्यवस्था मंदिर समिती मार्फत मोफत करण्यात येणार आहे.
  तरी इच्छुक भाविकांनी सदर योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी मंदिर समिती कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर मार्फत करण्यात येत आहे. सदर योजनेच्या अटी, शर्ती, माहिती व अर्जाचा नमुना मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर व श्री.संत तुकाराम भवन, पंढरपूर येथील कार्यालयात उपलब्ध आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)