पाटील - पवार - रोंगे एकाच व्यासपीठावर
पटवर्धन कुरोलीच्या बैठकीत अमरजीत पाटील यांची जोरदार टीका
विठ्ठलचे माजी संचालक यांचा अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मागील वर्षी पार पडलेल्या विठ्ठलच्या निवडणुकीपासून अभिजीत पाटील नावाचे वादळ आले आहे. हा नेता दिलेला शब्द पळतो ही एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन या सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीत जाईल त्या गावात विरोधक असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी गटात प्रवेश सुरु केले आहेत. पटवर्धन कुरोली येथील बैठकीमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्याने इंनकमिंगची मालिका सुरूच असल्याने विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे.
या बैठकीस सत्ता परिवर्तनासाठी एकाच व्यासपीठावर चेअरमन अभिजीत पाटील, ॲड.दिपक पवार, डॉ.बी .पी. रोंगेसर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी अमरजीत पाटील यांनी विरोधकांच्या चुका सभासदांसमोर मांडल्या. कर्मवीर औदुंबर आण्णांचे फोटो कोणी काढले .असा सवाल अमरजीत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला असून याची उत्तरे द्यावी असे सांगितले.
अभिजीत पाटील म्हणाले.....विरोधक माझा बाप काढता आज माझे वडील असते तर अभिमानानं सांगितलं असतं की अभिजीत सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी लढतोय. सोलापूर जिल्ह्यात एफ आर पी न देणारे कारखाना म्हणून सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखाना यांची ओळख आहे. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. श्री विठ्ठल कारखाना प्रमाणेच प्रामाणिकपणे सहकार शिरोमणीला पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले. यामुळे आता या निवडणुकीतही विजय निश्चित असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कांतीलाल भिंगारे, दीपक सदाबसे, तसेच दिलीप नाना पुरवत या संचालकांनी तर तुकाराम नाना कौलगे, सोपान हरिदास कौलगे कल्याण गोरख सावंत, औदुंबर गोवर्धन कौलगे, संजय बाळकृष्ण सावंत, ज्ञानेश्वर भीमराव कौलगे, मोहन शहाजी सावंत, मेजर किसन कौलगे या सर्वांनी पाटील गटांमध्ये प्रवेश केला.