जागतिक योग दिनानिमित्त श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासने,प्राणायाम करून योग दिन साजरा केला.
योगश्चित्तवृत्तीनिरोधः l असे शास्त्र वचन आहे, प्रत्येक माणसाला विशेषतः विद्यार्थ्याला नित्य योगासन व प्राणायाम केल्याने चित्त स्थिर (mind stable) होण्यास मोठी मदत होते. व याचा त्यांच्या दैनंदिन जीवनात व अभ्यासात मोठा उपयोग होत असतो.
एक वर्षाची यशस्वी वर्षपूर्ती करून सद्य स्थितीत महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयात ४० हून अधिक विद्यार्थी वैदिक व वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांना वैदिक व वारकरी शिक्षणा सोबतच सेमी इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण देखील दिले जात आहे.
विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण हे प्राचीन भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीनुसार अर्थात विनामूल्य दिले जात आहे हे या विद्यालयाचे मुख्य वैशिष्ट्य आहे
अशी माहिती प्रधानाध्यापक ह.भ.प.वेदविभूषण उद्बोध महाराज पैठणकर यांनी दिली.