भालके यांच्या बी आर एस प्रवेशाचा राष्ट्रवादीवर परिणाम नाही

0

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्याचा केला निर्धार

पंढरपूर (प्रतिनिधी) - विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला राम राम करण्याचा निर्णय घेत. बाहेरच्या राज्यातील पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत चाचपणी करीत किती प्रमाणात परिणाम होईल. याबाबत तातडीची बैठक पंढरपूर येथे सोमवार सायंकाळी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष प्रवक्ते उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे पार पडली. यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जवळपास सर्वच राष्ट्रवादीतील विविध सेलचे पदाधिकारी यांची उपस्थिती दिसून आली. यामुळे भालके यांच्या जाण्याने कोणताही परिणाम जानवणार नाही. या उपस्थित पदाधिकारी यांनी आम्ही पवार साहेब यांच्या पाठीशीच भक्कमपणे उभा राहणार असून जो उमेदवार द्याल त्यासाठी जीवाचे रान करून राष्ट्रवादीतून गेलेली आमदारकी परत खेचून आणू असे ठणकावून सांगितले आहे.
सध्या पंढरीत आषाढी वारी सुरू आहे. यामुळे अनेकजण कामात व्यस्त आहेत.तरीही या अचानक बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी शरद पवार यांच्यासाठी आवर्जून उपस्थिती दाखविली. यावरून भगीरथ भालके यांच्या सोबत फारसे पदाधिकारी जाणार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, चेअरमन कल्याणराव काळे,विठ्ठल चेअरमन अभिजीत पाटील, ॲड गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, यांच्यासह वरील दोन्ही तालुक्यातील विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपले विचार मांडले. यावेळी पवार साहेब हे कार्यकर्त्याची कामे करणारे नेते असून त्यांच्यापासून कोणताही पदाधिकारी बाजूला न जाताच निष्ठा जोपासण्याचे काम करणार आहे. हे या उपस्थित पदाधिकारी बैठकीतून दिसून आले आहे. आपण सर्वांनी ज्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ते आपल्यावरच खापर फोडून एका नवख्या पक्षात जात आहेत. त्यांच्या सोबत नेमके कोण कोण? जातील हा अंदाज घेण्यासाठी साहेबांनी ही चाचपणीची बैठक पंढरीत घेण्याची सूचना केली असल्याचे सांगितले. यामुळेच अवघ्या दोन तीन तासातही निरोप पोहचताच सर्व पदाधिकारी यांनी आम्ही आपल्या सोबत असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल तो विजयी होण्याची खात्री पटली असल्याचे साठे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
    जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी यांनी अतिशय तिखट शब्दात भगीरथ भालके यांच्यावर टीका केली. आपणाला पोट निवडणुकीत मिळालेली मते ही आपल्यामुळे मिळाली असती तर आपण आपल्या गावातून लढलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कसे पराभूत झाला. केवळ स्व. आ. भारतनाना भालके यांच्या प्रेमा पोटी त्यांना लोकांनी तीनवेळा स्वीकारत विजयी केले होते. परंतु नाना हयात असताना तुम्हाला मात्र जनतेने स्पष्टपणे नाकारले असल्याचा आवर्जून उल्लेख केला. विनाकारण रडगाने मांडत आपण राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची भाषा करीत आहात.परंतु  तुमाला कारखान्यासाठी दिलेले पैसे आपण न वापरता दुसरीकडे गेले.यामुळे तुमच्यावर अशी वेळ आली आहे. तुम्ही हिमतीने कमी पडलात. तरीही तुम्ही जात आहेत. तुमच्या भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही तेलंगणात जाणार का? असा प्रश्न करीत भालके यांनी खिल्ली उडविली.

भाजपने मागील निवडणुकीत दलीत आणि मुस्लिम समाजातील मते आपल्याला मिळत नाहीत. हे गृहीत धरून बी टीम तयार करून काँग्रेस आघाडीकडे जाणाऱ्या या मताला रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याच प्रकारे या निवडणुकीत  भाजपने  शेतकऱ्यांना गृहीत धरले नसल्याने यावेळी हे शेतकरी मतदान तिसरीकडे वळविण्यासाठी या बी आर एस पक्षाला समोर केले आहे. हे आता शेतकरी ओळखून आहे.त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादी सोडण्याने कोणताही मतावर परिणाम जाणवणार नसल्याचेही आवर्जून उमेश पाटील यांनी सांगितले आहे.

चेअरमन कल्याणराव काळे यांनी खा. शरद पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. आजवर खा शरद पवार साहेब यांना विरोधक यांनी अडचण केली नसून आपल्याच लोकांच्या चुकीच्या पद्धतीने अडचणी होत असल्याचे सांगितले. आपण आषाढीवारी होताच लवकरच एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी सभा घेणार असल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी आपले विचार मांडत, आम्ही मागील तीन पिढ्या पवार साहेब यांच्यावर निष्ठा ठेऊन आहोत. असे सांगत. आमचे इथल्या पातळीवर मत मतांतर असेल. मात्र पवारसाहेब आमचे दैवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी अनेक मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांनी द्याल तो उमेदवार निवडून आणू असे सांगितले. यामध्ये जेष्ठ नेते सुभाष भोसले, नागेश फाटे, राहुल शहा, श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे, साहेबराव भुसे, साधनाताई राऊत,राजश्रीताई ताड, संगीताताई कट्टे, रामेश्वर मासाल, अनिताताई पवार, शिवानंद पाटील, सोमनाथ माळी, चंद्रशेखर कोंडुभैरी, आर डी पवार, विजय काळे, लतिफ तांबोळी, सुधीर भोसले, सागर पडगळ, अरूण आसबे, प्रणव गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी आपण राष्ट्रवादी मध्ये असल्याचे सांगितले. यावेळी रणजित पाटील, स्वप्नील जगताप, बाळासाहेब शेख, चारुशीला कुलकर्णी, शुभांगी जाधव, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

चार पावले मागे घेण्याची तयारी : अभिजीत पाटील

आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याचा उपयोग आपण स्वतः चा गट निर्माण करण्यासाठी नाही तर पक्ष वाढीसाठी करणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. आपण पक्षाच्या धोरणानुसार काम करत राहणार असून पवारसो यांचे विचार वाढविण्यासाठी चार पावले मागे सरण्याची तयारी देखील आपण ठेवली असल्याचे सांगत. यापुढील काळात कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यासाठी त्यांनाही संधी मिळावी यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती यासह गावपातळीवरील निवडणुकीत बळ देणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)