मनोरमा सह. बँकेच्या संचालकपदी डॉ.बी.पी.रोंगे सर यांची निवड

0
पंढरपूर (प्रतिनिधी) - मनोरमा सहकारी बँकेच्या नूतन संचालकपदी पंढरपूर येथील स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली. नव्या संचालक मंडळामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचा समावेश करण्यात आला आहे.

मनोरमा बँकेच्या पुणे व सोलापूर येथे सहा शाखा आहेत तसेच मनोरमा मल्टीस्टेटच्या ७२ शाखा आहेत. मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट व इतर संस्था यांची एकूण वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार ९५० कोटींची आहे. बँकेचा एनपीए गेल्या पाच वर्षांपासून शून्य टक्क्यांवर आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे.स्वेरी परिवार व इंजिनिअरिंग कॉलेज,पंढरपूर या संस्थांची शिस्तबद्ध व यशस्वी वाटचाल करणारे प्राचार्य डॉ.रोंगे सर यांच्या शिस्तीचा अनुभवाचा मनोरमा परिवार व बँकेस निश्चितपणे लाभ होईल तसेच नव्याने होणाऱ्या पंढरपुर शाखेच्या वाटचालीसाठी डॉ.बी.पी.रोंगे सरांचा सक्रीय सहभाग निश्चितपणे मोलाचे ठरेल,असे गौरवोद्गार बँकेचे चेअरमन व मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी काढले.

  डॉ.बी.पी.रोंगे सर यांचे निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत  आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)