मंगळवेढा (प्रतिनिधी) - कचरेवाडी ता. मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. हा कारखाना गळीत हंगाम २०२३-२०२४ ची संपूर्ण तयारी करीत आहे. या पूर्वतयारीचाच एक भाग म्हणुन आज शुक्रवार दि.०२/०६/२०२३ रोजी मिल रोलर चे पूजन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्स चा गळीत हंगाम २०२३-२०२४ हा दहावा गळीत हंगाम आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे चांगल्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. तथापी, येणारा गळीत हंगाम हा उपलब्ध पर्जन्यमान यावर अवलंबून आहे. या वर्षी पर्जन्यमान चांगले असेल अशी आपण अपेक्षा करुयात. त्यामुळे येत्या हंगामात युटोपियन शुगर्सचा हा दशकपूर्ती गळीत हंगाम हा विक्रमी करण्याचा आमचा माणस आहे. त्यानुसार कारखान्याचा शेती विभाग काम करत असून तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण करण्यात आलेले आहेत. शेती विभागाच्या प्रतींनिधी यांनी ऊस उत्पादक यांचे कडे पोहचणे महत्वाचे आहे त्यानुसार शेतीविभाग कार्यरत आहे. त्याच प्रमाणे अभियांत्रिकी विभाग व उत्पादन विभाग ही आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करेल तसेच मागील ९ वर्ष ऊस उत्पादकांच्या विश्वासावरच व कामगार वर्गाच्या श्रमावर युटोपियन शुगर्स लि. हा १० व्या वर्षात पदार्पण करीत असून येणाऱ्या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद ही परिचारक यांनी व्यक्त केला.