पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी वारी निमित्त पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेल्या विठ्ठल वारकरी भक्त भाविक यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिर समितीचे वतीने दर्शनबारीत असणाऱ्या वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आषाढी यात्रा तोंडावर आली आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दर्शन लाईनमध्ये उभे आहेत. दर्शनाची लाईन आज गोपाळपूर येथील दर्शन बारी शेड नंबर दोनमध्ये आहे. वरचेवर भाविकांची गर्दी दर्शन बारीत वाढत आहे.
दर्शन बारीत उभारलेल्या भाविकांना उन्हाळा भरपूर असल्याने उकाड्याचा भरपूर त्रास होत आहे. उघड्यामुळे भाविकांना पाणी पाणी होत आहे. या परिस्थितीचा विचार करून मंदिर समितीकडून थंड पिण्याचे पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. दर्शन बारीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर पाच ठिकाणी थंड पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर समितीने केलेल्या भाविकांच्या सेवेबद्दल भाविक वारकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.