पंढरपूर (प्रतिनीधी) - शहर परिसरातील विविध भागात नगरपरिषद व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. चार सूचना लिहिल्यानंतर शेवटी लिहिले आहे की, संशयास्पद वस्तू, हालचाली आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. मात्र संपर्कासाठी कोणताही फोन नंबर, मोबाईल नंबर दिलेला नाही. त्यामुळे नागरिक, भाविक पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क कसा साधू शकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. संपर्क क्रमांक असणे अत्यंत गरजेचे होते. त्याप्रमाणे संपर्क क्रमांक लिहिण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अ.भा ग्राहक पंचायत तर्फे करण्यात येत आहे.
नगरपरिषद व पोलीस दलातर्फे लावण्यात आलेल्या फलकांवर संपर्क क्रमांक असावेत - ग्राहक पंचायतीची मागणी
June 25, 2023
0
Tags