मंदिराच्या कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र शेळके

0


आषाढीपूर्वी मंदिराला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाल्याने समाधान


पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी  राजेंद्र शेळके  उपजिल्हाधिकारी हे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांना मंत्रालयाच्या विधी व न्याय विभागामार्फत सदर पदभार देण्यात आला. 

सोमवारी शेळके हे विठ्ठल मंदिरात येऊन पदभार स्वीकारणार असून आषाढीपूर्वी अखेर मंदिराला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. भाविकांच्या , वारकरी, विठ्ठल भक्त, स्थानिक लोक यांच्या मागण्या, सेवा सुविधा, अपेक्षा आदी सर्व विषय वेगाने मार्गी लागू शकणार आहेत. शेळके यांनी मुंबईत पदभार स्वीकारल्याने आता अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या खुर्चीवर पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी मिळाला आहे.  

गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते, त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्याकडे याचा पदभार दिला जात होता. विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके सोमवारी  रुजू होणार आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)