शरीर निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे गरजेचे : न्यायाधीश खंडाळे

0
सायकल दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी) :- आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, सायकल चालवण्याने संपूर्ण शरीराला व्यायाम होऊन शरीर निरोगी व सुदृढ राहते सध्याच्या जमान्यांमध्ये मुलांचा कल सायकल चालवण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळण्यात व इतर खेळण्यात व्यस्त होतो त्यापेक्षा सध्याची तरुण पिढी सायकल चालवण्याकडे कशी वळली जाईल याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश खंडागळे यांनी केले. 

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय महेश लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कायदेविषयक शिबाराचे आयोजन पंढरपूर येथील जिजाऊ उद्यान, हुतात्मा स्मारक  करण्यात आले. 

3 जून हा जागतिक सायकल दिवसल्याने  पंढरपूर सायकल क्लबच्या संयुक्त विद्यमाने तसेंच सदर क्लबचा 5 वा वर्धापनाचे औचित्य साधून शिबाराचे आयोजन करण्यात आले.

सर्व प्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  तद्नंतर सायकल क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध भागातून व शहरातील आलेल्या सायकल प्रेमी सायकल पटूंचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी 80 वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

अभिवक्ता संघाचे नूतन अध्यक्ष श्री अर्जुन पाटील बोलताना म्हणाले, उपस्थित असलेले सायकलपट्टूकडे पाहिल्यानंतर आम्हाला लाजल्यासारखे वाटते आजही या 80 व्या वर्षात सायकलवर रनिंग करणारे चालवणारे पाहिल्यानंतर आपणही सायकल चालवली पाहिजे सायकल चालवणे त्यामुळे शरीर निरोगी राहते असे सांगितले.

 यावेळी सचिव श्री राहुल बोडके, डॉ. मनोज भाईगुडे, दहक कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील, विधी सेवा समितीचे विधिस्वयंसेवाक श्री महेश भोसले, श्री. अंकुश वाघमारे, पांडुरंग अल्लापुरकर, विष्णू मैंदर्गीकर, नंदकुमार देशपांडे, शहरातील सायकल प्रेमी व मध्यमवयांपासून ते 80 वर्षापर्यंत सायकलिंग करणारे सायकलपटूही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्रराव आभार महेश भोसले यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)