अवैध वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करणार.- प्रांताधिकारी श्री. गजानन गुरव

0
पंढरपूर (प्रतिनिधी) चंद्रभागा नदीचे पाणी कमी झाल्याने तसेच शहरातील विविध प्रकारच्या बांधकामांना वाळू मोठ्या प्रमाणात लागत असल्याने होडी आणि गाढवे यांच्याद्वारे चोरून वाळू काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत तक्रारी वाढत असल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करा वर कारवाई केली असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी श्री गजानन गुरव यांनी शनिवार दिनांक १७ जून रोजी दिली.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर उपस्थित होते.
गुरव म्हणाले, सध्या आषाढी वारी तयारी चालू असूनही वाळू तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी महसूल, न पा प्रशासन यांची मदत घेतली जात आहे. काल मध्यरात्री दोन वाजता सांगोला जाकवेल येथे वीस ब्रास वाळू आणि तीन होड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या होड्या महेश तुकाराम ताठे याच्या आहेत. आज पहाटे वाळू वाहतूक करणात्रे बावीस गाढव ताब्यात घेण्यात आली आहेत भय्या माने, अक्षय माने, अजय जाधव यांची ही गाढव आहेत. ही गाढव सोलापूर महापालिकेच्या कोंडवड्यात पाठविण्यात आली आहेत. वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.२१-२२ साली ४२ कोटी,२२-२३ साली ७४ कोटी तर चालू वर्षी १५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.एकूण ९२२ गाढवावर कारवाई करण्यात आली आहे.
शासकीय वाळू कमी दरात सुरू झाली की चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसेल असे गुरव म्हणाले,
ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधी या वाळू तस्करांना सहकार्य करीत असतात, तसे दिसून आल्यास त्यांचे पद रद्द करण्याची कारवाई केली जाईल. एका सरपंचाचे पद अशा प्रकारे गेले आहे. 
अनधिकृत उत्खनन करणाऱ्या लोकांची माहिती स्थानिक, ग्राम पंचायत प्रशासनाने सांगावीत असे आवाहन गुरव यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)