लघुपटाव्दारे शिक्षणाच्या अधिकाराचे महत्व

0

न्यायाधीश एम. बी.लंबे यांचा अनोखा उपक्रम

                       

पंढरपूर, दि. 17 (उ. मा. का.) :  किमान समान शिबीरा अंतर्गत पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्यावतीने किमान समान शिबीरा अंतर्गत आज शनिवार, दिनांक १७ जुन, २०२३ रोजी अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर येथे जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना लघुपटाव्दारे शिक्षणाच्या अधिकाराचे महत्व समजावण्यात आले.

सदर शिबीरामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या अधिकाराबद्दल महत्व सांगणारा  व अमित काटकर  दिग्दर्शन केलेला " खिडकी " हा लघुपट दाखवण्यात आला. या लघुपटामध्ये गरीब घरातील मुलींना शिक्षण घेणेसाठी कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते व त्यावर कशी मात करता येते याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्यात आला आहे. सदर लघुपटास दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल २०२३ मध्ये १५ वे स्थान मिळाले होते. या लघुपटास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लघुपटामध्ये विधीज्ञ पल्लवी कांते, जुलेखा मुटवली, दिपक कांबळे व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले आहे.  

 यावेळी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांनी सदर लघुपटामधुन नेमका कोणता संदेश आहे त्याबद्दल विस्तुत माहिती  दिली. तसेच  मुलींना शिक्षित केल्याने शिक्षणाच्या प्रत्येक दृष्टीकोनातून मुलींचे कौशल्य आणि अनुभव सुधारण्याचा प्रयत्न होतो.  मुलींना शाळेत असताना सुरक्षित वाटेल आणि शिकावे, नोकरी सुरक्षित करण्यासाठी कौशल्ये आणि क्षमतांसह सर्व स्तरांचे शिक्षण पूर्ण करावे, त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल निर्णय घ्यावा आणि त्यांच्या समुदायासाठी आणि जगासाठी योगदान द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुलींना शाळेत न पाठवण्यामागे लोकांची वेगवेगळी असतात एक म्हणजे हे त्यांना त्यांच्या घरगुती कर्तव्ये करण्यापासून रोखेल, दुसरे म्हणजे शाळेत जाण्यासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करावा लागेल, तिसरे हे की लोकांना भीती वाटत होती की शाळा मुलींना घरापासून दूर नेईल. अशा प्रकारे शिक्षणाबद्दलचे महत्व न्यायाधीश बुद्रुक यांनी सांगितले.

या लघुपटाबद्दल विद्यार्थींनी कु. अचल भुतडा हिने आपले मत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.कायदेविषयक शिबीराची प्रस्तावना पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील व सचिव राहुल बोडके यांनी केली तर सूत्रसंचालन सहशिक्षीका श्रीमती मनिषा डंके यांनी केले.

सदर शिबीरास पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अॅड. शशिकांत घाडगे, सचिव राहुल बोडके, सदस्य अॅड.शितल आसबे, अरिहंत पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्रीमती सुप्रिया बहिरट, सहशिक्षीका श्रीमती मनिषा डंके, श्रीमती मनुताई गंभीरे, विधी सेवा समितीचे विधीस्वयंसेवक श्री. सुनिल यारगट्टीकर, श्री. अॅड.अंकुश वाघमोडे, श्री. पांडुरंग अल्लापूरकर, न्यायालयीन कर्मचारी श्री. मिलींद नरखेडकर, श्री. विशाल ढोबळे, श्री. अविनाश कांबळे, श्री. विवेक कणकी, श्री. एम. के. बनसोडे तसेच उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)