शिवतीर्थावर सहकार शिरोमणीच्या निवडणुकीची विजयी सभा

0
पंढरपूर (प्रतिनिधी) -  पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये  काळे गटाने दणदणीत विजय मिळविला आहे. यासाठी मंगळवार दि.20 जुन रोजी सायं.05 वाजता विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही विजयी सभा पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार आहे. यावेळी सहकार शिरोमणीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे, शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव, विठ्ठल परिवाराचे नेते युवराज दादा पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगिरथ भालके, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ॲड.गणेश पाटील, युवा नेते समाधान काळे, शिवसेनेचे संभाजी राजे शिंदे, सुधीर अभंगराव, जयवंतराव माने, रवि मुळे, शेतकरी संघटनेचे नितिन बागल, समाधान फाटे, माऊली जवळेकर, माजी संचालक सुधाकर कवडे आदी मान्यवरांच्या उपस्थित विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेसाठी सहकार शिरोमणीचे आजी माजी संचालक, विठ्ठलचे माजी संचालक, आजी माजी नगरसेवक, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे संचालक, प्रतिभादेवी पतसंस्थेचे संचालक, निशिगंधा सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांचेसह श्रीविठ्ठल परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, मोठया संख्येनी उपस्थित राहणार आहेत. तरी या विजयी सभेसाठी विठ्ठल परिवारातील सर्व सभासद, कार्यकर्ते, यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी 05 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)