कृषि प्रदर्शनाचे व तृणधान्य महोत्सवाचे पंढरीत आयोजन

0
दिनांक २८ ते ३० जून २०२३ या कालावधीत कृषी प्रदर्शन

पंढरपूर (प्रतिनिधी) - दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला भेट देत असतात. यामध्ये ९० टक्के पेक्षा जास्त शेतकरीच असतात त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व तृणधान्याचे महत्व कळावे यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगण, पंढरपूर येथे दिनांक २८ ते ३० जून २०२३ या कालावधीत "कृषि पंढरी कृषि प्रदर्शनाचे व तृणधान्य महोत्सवाचे" आयोजन करण्यात आलेले आहे.

कृषि प्रदर्शनामध्ये कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचवणे तसेच शेतकरी शास्त्रज्ञ संशोधन-विस्तार विपणन साखळी सक्षमीकरण थेट विक्री शृंखला विकसीत करणे, शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे व बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा उद्देश आहे.

सदर कृषि प्रदर्शनामध्ये एकुण १२५ स्टॉल्स असणार आहेत सर्व स्टॉल्स मोफत आहेत. प्रत्येक स्टॉलची साईज १०x६ फुट असणार आहे. त्यापैकी ४० स्टॉल्स शासकीय विभागाच्या विविध योजना व शेतक-यांच्या यशोगाथा, ४० स्टॉल्स हे मिलेट, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ४० स्टॉल्स हे कृषि निविष्ठा, ठिबक, तुषार सिंचन व उर्वरीत ५ स्टॉल्स शेती यंत्र सामुग्रीचे आहेत. यामध्ये कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतक-यापर्यंत पोहचवणे, सर्व शासकीय विभागांच्या योजनांच्या माहिती, कृषि निविष्ठा, अन्नप्रक्रिया, लघुउद्योग, कृषि औजारे, तृणधान्य पदार्थ, शासन आपल्या दारी योजना, कृषि तंत्रज्ञान आधारीत विविध प्रात्यक्षिके असणार आहेत. सदर महोत्सवात कृषि विभाग, आत्मा यंत्रणा, कृषि विद्यापीठ व संशोधन केंद्रे, जिल्हा ग्रामीण यंत्रणा, राज्य शासन व जिल्हा परिषदेचे विविध विभाग, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सहभागी होत आहेत.

सदर महोत्सवासाठीची आर्थिक तरतूद जिल्हा वार्षिक योजना यांचे माध्यमातुन करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी व नागरीकांनी या कृषि महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन गावसाने
जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी सोलापूर व मदन मुकणे प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर यांनी केले आहे.
यावेळी लांडगे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, सूर्यकांत मोरे तालुका कृषी अधिकारी, जयवंत कवडे उपविभागी कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)