सहकार शिरोमणीचे माजी संचालक दिपक पवार यांचा ठाम विश्वास
पंढरपूर (प्रतिनिधी) - सहकार शिरोमणीची प्रगती होण्याऐवजी वरचेवर अधोगती होत असल्याचे चित्र निर्माण करून स्वतःचेच घर भरणाऱ्या चेअरमन काळे यांना बाजूला सारून या कारखान्यावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी आणि रोंगेसर यांनी वेगवेगळे लढत सुरुवात केली होती. त्यावेळी मागील निवडणुकीत अपयश आले होते. मात्र त्यांना त्यातूनही सुधारण्यासाठी अनेक वर्ष संधी मिळूनही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे आम्ही आता या निवडणुकीत दोघेही एकत्रित तर आलोच आहोत. परंतु दिलेला शब्द पाळणारा आणि कारखाना चालवणारा माणूस म्हणून ब्रँड ठरलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत मात्र नक्की यश मिळणार असून अभिजीत पाटील यांचाच धक्का परिवर्तनासाठी गुणकारी ठरणार असल्याचा विश्वास याच कारखान्याचे माजी संचालक आणि सध्याचे उमेदवार ॲड दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.
अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडी पॅनलचे उमेदवार यांच्या प्रचारसाठी शनिवारी तावशी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी दिपक पवार बोलत होते. यावेळी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, मार्गदर्शक डॉ बी पी रोंगे सर, अमरजित पाटील, यांच्यासह विठ्ठल चे संचालक उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपक पवार म्हणाले की, या कारखान्यावर परिवर्तन करण्यासाठी मागील सात वर्षांपासून रोपटे लावले होते. तेव्हापासून या कारखान्याच्या सभासद आणि कामगार यांच्या हितासाठी आपण लढा उभा केला होता. यामधून सहकार शिरोमणीचे हजारो सभासद यांचे सीताराम कारखान्याकडे अडकून पडलेले पैसे ही आपण कायदेशीर मार्गाने मिळवून दिले आहेत. आशा हजारो सभासद यांना याची जाणीव राहून ते आमच्याच पॅनलचे उमेदवार यांना मतदान करतील असा आशावादही दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.
आमचे आणि चेअरमन कल्याणराव काळे यांचे कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. केवळ मी कारखान्याकडे असणारे देणे देण्यासाठी लढाई लढत आहे.यामुळे तुमच्यासाठी उभा केलेल्या या लढ्याला मताच्या रूपाने यश मिळावे. अधोगतीकडे हा कारखाना घेऊन जात असलेल्या काळे यांना बाजूला सारून, कारखाना विठ्ठल प्रमाणे प्रगतीकडे घेऊन जाणारे अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना विजयी करावे असे आवाहनही दिपक पवार यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांनीही कारखान्याची प्रगती होण्यासाठी लागणाऱ्या उपाय याबाबत माहीती दिली. विठ्ठलच्या निवडणुकीत तावशी या क्रांतिकारी गावामध्ये अखेरची सभा होऊन क्रांती घडली. त्याठीकाणी आपण जे शब्द दिले होते तो शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यावेळी विठ्ठलचे चेअरमन नॉटरीचेबल अशी बदनामी होत होती. ती विठ्ठलचे बाबतीत घडवून आणली आहे. त्याचप्रमाणे आता सहकार शिरोमणी ची होत असलेली बदनामी थांबविण्यासाठी आमच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
यावेळी धोंडेवाडी येथील हनुमंत जालिंदर सावंत, अंकुश सावंत, छगन सावंत, महेंद्र सावंत, राजेंद्र सावंत, संजय ताटे, भगवान ताटे, पांडुरंग करडे, अजनसोंड येथील दिगंबर आप्पा डुबल, मारापूर येथील शंकर आसबे व यांच्यासह असंख्य सहकार्यांनी अभिजीत पाटील गटामध्ये जाहीर प्रवेश केला.....