विठ्ठल कारखाना येथे होणार विठ्ठल भक्तांची विश्रांतीची सोय

0
 श्री विठ्ठल कारखाना व महाराष्ट्र शासन यांचे वतीने आषाढी यात्रेकरिता येणाऱ्या भाविक भक्तांची यात्रा कालावधीमध्ये विश्रांतीची सोय

पंढरपूर (प्रतिनिधी) -- श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी यात्रा दि.२५.०६.२०२३ पासून दि.२९.०६.२०२३ पर्यंत सोहळा संपन्न होत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या कारखाना कार्यस्थळावर अहमदनगर जिल्ह्यातून २० ते २५ दिंड्या मुक्कामी येणार असून त्यांचे सोईसाठी कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याच्या व शासनाच्या वतीने भाविक भक्तांच्या विश्रांतीसाठी १० हजार चौरस फुटाचे व ५ हजार चौरस फुटाचे विश्रांती गृह उभारण्यात आलेले आहेत. तसेच कारखान्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकासाठी कारखाना कार्यस्थळावर विनामुल्य जागा दिलेली आहे. तसेच महिला व पुरुष भाविकांसाठी मोबाईल टॉयलेट, स्नानगृह, लाईट, शुध्द पिण्याचे पाणी अशा सर्व सोई उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच कारखान्याच्या वतीने काही दिंड्यांना जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे. सदर भाविक भक्तांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांचेसह अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने योग्य ते नियोजन करणेत आलेले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)