शाररीक व मानसिक आरोग्‍यासाठी नियमित योग करावे - अंकुश चव्हाण

0


'करा योग रहा निरोग'च्‍या  परिसरात घोषणा

९ व्या आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त योग दिंडी

 

सोलापूर, दि. १८.- शाररीक व मानसिक आरोग्‍यासाठी नियामित योग करावे, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीरमन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले.

     भारत सरकरच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयकेंद्रीय संचार ब्‍युरोसोलापूरजिल्‍हा प्रशासननेहरु युवा केंद्रपतंजली योगपीठयोग असोसिएशनविवेकानंद केंद्रभारतीय योग संस्‍थायोग सेवा मंडळयोग साधना मंडळगीता परिवार सर्व कल्‍याण योगरुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग यांच्‍या संयुक्‍त विदयामाने नवव्या आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त योग दिंडीच्या उदघाटन प्रसंगी श्री चव्हाण बोलत होते.

     यावेळी जिल्‍हा युवा अधिकारी अजितकुमारयोग समन्‍वयक मनमोहन भुतडापंतजली योग पीठाच्‍या केंद्रीय तथा महाराष्ट्र राज्य महिला प्रभारी सुधा अळळीमोरेसंगीता जाधव, दत्तात्रय चिवडशट्टी रोहिणी उपळाईकर, जितेंद्र माहमुनीरघुनंदन भुतडा आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.

      सेवासदन प्रशालेच्या मैदानावर दुपारी चारपासून लोकांनी रॅलीसाठी गर्दी केली होती. करा योग रहा निरोग’ मानवतेच्‍या कल्‍याणासाठी योग, हर दिल में योग हर घर में योग, भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणासह आज नवी पेठ परिसर दुमदुमला होता. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त पाचशे लोकांची काढण्यात आलेली योग दिंडी सेवासदन प्रशाला येथून निघून सरस्वती चौक-हुतात्मा चौक-सुभाष चौक-दत्त चौक मार्गे जाऊन सरस्वती प्रशाला येथे विर्सजीत करण्‍यात आली. यावेळी सर्व योग संस्‍थाच्‍या प्रतिनिधी यांनी योगविषयक संदेश देणारे फलकझेंडे आपल्‍या हातामध्‍ये घेतले होते.

  बुधवारी दि२१ जून २०२३ रोजी नववा आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍याकरिता सकाळी  ते  यावेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्‍या मैदानावर वसुधैव कुटुंबकमसाठी योग विषयावर योगाभ्यासाचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे अभ्यास सर्व वयोगटांसाठी खुले आहे. यामध्‍ये मोठया संख्येने लोकांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनकेंद्रीय संचार ब्यूरो आणि योग समन्वय समिती यांच्यावतीने यावेळी करण्यात आले.  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)