निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाई करू..
सरकारची भूमिका प्रामाणिक व संवेदनाशीलश आहे. येथील काही निकृष्ट "कामांची माहिती दिली असता त्यांनी अशी कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सत्तावीसशे कोटी रुपयांचा आराखडा येथे राबविला जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्पष्ट सूचना आहेत. तसेच येथील कामे करताना जर ती निकृष्ट असतील तर कारवाई केली जाईल, असे भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी स्पष्ट केल्याने पंढरपूरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आ. श्रीकांत भारतीय हे पंढरपूर दौऱ्यावर असताना विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचा २७०० कोटी रूपयांचा आराखडा तयार केल्याचे सांगितले होते. यामुळे पंढरपूरमध्ये कॅरिडोरची चर्चा रंगत होती. यावर बोलताना आमदार भारतीय म्हणाले, ज्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा तेथील नागरिकांना विश्वासात घेवूनच कामे करण्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा मानस आहे. यापूर्वी नांदेडमध्ये असा आराखडा तेथील जनतेला विश्वासात घेवून राबविला गेला आहे. पंढरपूरच्या बाबतीत ही तसेच होईल. पंढरपूरच्या नागरिकांनीही पुढील पाचशे, हजार वर्षाचा विचार करणे आवश्यक आहे. कारण आणखी दोन-चार पिढ्यानंतर या तीर्थक्षेत्राची अवस्था काय असेल हे लक्षात घेवून शासन आणि नागरिक व वारकऱ्यांनी एकत्रित येवून निर्णय घेणे गरजेचे आहे.