आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन सज्ज - जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे.

0
      पंढरपूर (प्रतिनिधी) - आगामी आषाढी वारी काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पोलिस संकुल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४२८ पोलिस अधिकारी , ५०१७ पोलिस, २८५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १० डी बी पथके संपूर्ण वारीत लक्ष ठेवून बंदोबस्त करण्यासाठी दक्ष आहेत. तसेच पंढरी  नगरीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही  कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
 पालखी मार्गाची पाहणी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
शहरात चार चाकी वाहने पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. चौफाळा, नामदेव पायरी, नदीचे वाळवंट, महाद्वार, विविध बारा घाट आणि नगर प्रदक्षिणा मार्गावर आषाढी एकादशी दिवशी मोठी गर्दी असते. या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष उपाय योजना राबविण्यात येणार आहेत. शिफ्ट पद्धतीने पोलिस गर्दीवर नियंत्रण ठेवणार आहेत.
स्वयंसेवक, एन सी सी , एन एस एस चे विद्यार्थी यांचीही मदत घेतली जाणार आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक हिंमतराव जाधव, पंढरपूर शहर पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)