आषाढी कार्तिकी विसरू नका मजा l
सांगत असे गुज पांडुरंग ll
पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, येणाऱ्या लाखो भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुलभ दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीकडून विठ्ठलाचा पलंग काढून नित्योपचार बंद करून मंगळवार दि. २० जून पासून २४ तास दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यासोबत येणारे वारकरी, भाविक , विठ्ठल भक्त मंडळी तसेच आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरीत दाखल होणारे वारकरी, संत महात्मे , विविध भागातून येणाऱ्या दिंड्या, देश-विदेशातून, महाराष्ट्रातून येणारा विठ्ठल भक्त यांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर समितीने 24 तास दर्शनाची सोय केली आहे.आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात १२ ते १५ लाख भाविक दाखल होतील असा प्राथमिक अंदाज आहे .
दशमी, एकादशी, व्दादशी दिवशी मंदिर समितीकडून दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, नाष्टा देण्यात येणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी मंदिर समितीकडून उपाय योजना करण्यात येणार आहेत.