सरगम चौक ते विसावा रस्ता केव्हा दुरुस्त होणार

0
ग्राहक पंचायतीची विचारणा 

पंढरपूर (प्रतिनीधी)-  विसावा(इसबावी) ते सरगम चौक हा सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर येथे येण्याचा व पालख्यांच्या स्वागतासाठी भाविकांचा जाण्याचा महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्याची दुरुस्ती, पॅच वर्क, साईड पट्टी भरणे इ. कामे पुर्ण होणे आवश्यक होते तसे झालेले दिसून येत नाही. त्यावर पूर्ण डांबरीकरण होणे गरजेचे होते. आता पालख्या वाखरी येथे पोहोचत आहेत मात्र कामे चांगल्या पद्धतीने झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे केव्हा पुर्ण होणार अशी विचारणा नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका सचिव प्रा. धनंजय पंधे यांनी केलीआहे. खड्डे बुजविणे, डबके साठणार नाहीत याची काळजी घेणे, चेंबरचे, मातीचे उंचवटे कमी करणे,अतिक्रमण काढणे इ. कामे चांगल्या पद्धतीने होणे अपेक्षित होते. तथापी तसे झालेले दिसून येत नाही.  उदा.केबीपी कॉलेज समोर, राधेश हॉटेलसमोर , पेट्रोल पंपासमोर, डीव्हीपी समोर, मार्केट यार्ड अलीकडे -पलीकडे, चंद्रभागा बस स्थानकाची बाजू, सरगम चौक फर्निचर दुकान, एटीएम समोर इ.अशी अनेक ठिकाणे अद्यापही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. तातडीने पाहणी करून आवश्यक ती कामे पूर्ण करुन घ्यावीत. 

या वारीकडे मा. मुख्यमंत्री यांचे विशेष, बारीक लक्ष आहे हे आपण सर्वजण जाणतोच. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये असे त्यांचे आदेश आहेत, या कामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्याने स्वतःचा मोबाईल नंबर जाहीर करून जनतेकडून माहिती जाणून घेणे अपेक्षित होते . त्यांनीही तसा प्रयत्न केला नाही. मा.मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना संबंधित विभागानेही  तसा प्रतिसाद देणे अपेक्षित आहे.तथापि तशी परिस्थिती नाही.तरी तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)