सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये आगळे वेगळे “संगीत कला प्रदर्शन”

0
तब्बल ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

शालेय स्तरावर पहिलाच यशस्वी प्रयोग

     पंढरपूर (प्रतिनिधी) :- २१ जून रोजी जागतिक संगीत दिन व जागतिक योगा दिन म्हणून आज संबंध जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.पण यात पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल मधील आगळे वेगळे असे “ संगीत कला प्रदर्शन” पाहण्यास मिळाले व यातून एक वेगळाच आदर्श निर्माण केलेला दिसला. संपूर्ण जागतिक संगीतातील तब्बल २०० हुन अधिक विषयावर एक विशेष संगीत कला प्रदर्शन अयोजित केले होते. यासाठी इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील तब्बल ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
      शालेय स्तरावरील संगीत शिक्षण, संगीत शिक्षणाच्या दिशा व दशा, विविध देशातील संगीत शिक्षण व्यवस्था, मानवी जिवनातील संगीत शिक्षणाचे स्थान, विविध भागातील लोकसंगीत, जागतिक रंगमंच व इतिहास, कार्टून संगीत, फिल्म संगीत, ग्रामीण संगीत शिक्षण व्यवस्था, विविध वाद्यांचा इतिहास ते आधुनिक परिवर्तन, वाद्यांची बनावट पद्धती, भारतरत्न पुरस्कार कलाकारांचे संगीत विश्व, मानवी मेंदुवर परिणाम करणारे संगीत कलेतील विविध घटक, संगीत कलेतील भविष्य, जिवन व संगीत, समाज व संगीत, संगीत कलेतील विज्ञान, अध्यात्म व संगीत, संगीत कलेतील आदर्श शिक्षण पद्धती अशा विविध २०० विषयावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अभ्यास विषयक विविध कलात्मक असे मॅाड्यूल, संशोधन प्रबंध व सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व पालक परिवार सदस्य म्हणून सुप्रसिद्ध बासरी वादक नंदकुमार डिंगरे, जेष्ठ गायिका शुभांगीताई मनमाडकर, कॅंम्पस डायरेक्टर डॅा. कैलास करांडे, इस्टेट मॅनेजर रोहन नवले आदीसह मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिथा नायर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)