घरोघरी भेटी अन हळदी कुंकू यामुळे वाढला संपर्क
पंढरपूर (प्रतिनीधी) - पंढरपूर तालुक्यात सुरु असलेल्या सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काळे गटाकडून मागील अनेक दिवसापासून गाव भेट दौरे सभासदांच्या गाठीभेटी चालु होत्या प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अशातच मागील आठवडयापासून चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पत्नी संगिताताई काळे, जयश्रीताई विलासराव काळे, मोनिकाताई समाधान काळे यांच्यासह अनेक महिलांनी सभासदांच्या घरोघरी भेटी देवून हळदी कुंकांचा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. यामध्ये संपर्क वाढून सभासदांतून काळे गटासाठी चांगला प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवडयापासून महिलांनीही या प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये पिराचीकुरोली, चिंचणी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, दसूर, गार्डी, सोनके, कोर्टी, बोव्हाळी,भाळवणी, शेळवे, भंडीशेगांव, धोंडेवाडी यासह अनेक गावातून महिलांची प्रचार फेरी सुरु आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले जात असून सभासदांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी नागरबाई काळे,सुनिता काळे, स्वाती काळे, नम्रता काळे, मंगल काळे, लता काळे, उज्वला बागल, तेजश्री काळे, विमल खरात, सुरेखा खरात, राधिका कोळेकर, यशोदा कोळेकर, नंदा कोळेकर, मनिषा कोळेकर, पुष्पा हिंगमीरे, चंद्रबाई फाटे, सुवर्णा बाजारे, स्वाती फाटे, विमल फाटे, जयश्री फाटे, विमल पवार, शकुंतला फाटे, आशा शिनगारे, कौशल्या फाटे, रंजना फाटे, मनिषा फाटे, मेघा फराडे आदी महिल्या उपस्थित होत्या.