चेअरमनची उस्तुकता लागलेल्या काळे यांना अभिजीत पाटील यांनी दिले भाळवणी सभेतून उत्तर
पंढरपूर (प्रतिनिधी) - सध्या सहकार शिरोमणीची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सत्ताधारी काळे गटाकडून बिघडलेल्या आपल्या कारभारावर पुढे सुधारणा कशी होईल यावर बोलण्यापेक्षा आमच्या पॅनलच्या मधून चेअरमन पदाचा उमेदवार कोण? याबाबत प्रत्येक गावात विचारणा होत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणी तर चेअरमन होणार हे तर नक्की आहेच. मात्र कल्याणराव काळे मात्र माजी चेअरमन होणार हे फिक्स आहे. असे उत्तर अभिजीत पाटील यांनी दिले आहे.
सहकार शिरोमणीचे निवडणुकीतील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासांठी भाळवणी येथे मोठ्या उत्साहात बैलगाडीतून अभिजीत पाटील, रोंगेसर, दीपक पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अभिजीत पाटील बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिजीत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सत्ताधारी काळे यांचा समाचार घेतला. विठ्ठलचे निवडणुकीत आपण त्या सभासद यांना जे शब्द दिले होते.ते पूर्ण केले आहेत. त्याच धर्तीवर आपण या निवडणुकीतील सभासद आणि कामगार यांना आताच शब्द देत आहोत. असे सांगत, मी कल्याणराव काळे यांचे प्रमाणे देतो देतो म्हणत न बसता सत्ता देताच लगेच आपली देणी देऊन टाकणार असल्याचेही सांगितले. मागील अनेक वर्षातील काळे यांचा कारभार पाहता ही संस्था अधोगतीकडे नेली आहे. यामधून स्वतःचे हित मोठ्या प्रमाणात साधले असल्याचेही सांगितले. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात काटामारी झाली आहे. त्याचा पुरावाही सादर करण्यात आला.
मुळात कल्याणराव काळे यांच्या हातात कारखाना देतेवेळी त्यांचे नाव सभासद यादीत नव्हते.समाधान काळे यांचे नाव खोडून यांचं नाव घेतल होते. ते चुकीचे केल्यानेच सगळ गणित चुकत गेलं असून यामध्ये सभासद आणि कामगार यांचे बिघडलं असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे. काळे हे भाषणातून सभासद हीच माझी प्रॉपर्टी आहे असे सांगत आहेत. त्यामुळे या सभासदांच्या संपत्तीवर विविध बँकाचा बोजा चढविला आहे. त्यामुळे आता हा सभासद यांचेपासून जवळ फिरकणार नसल्याचेही सांगत त्यांना आता याच सभासद कडून सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे.
या कारखान्याच्या निवडणुकीतही स्वतः बिले न देता, माझ्यावर बोलताना सांगोला कारखाना बिलाबाबत बोलले गेले. त्याही कारखान्याचा आपण १०० रुपयाचा हप्ता देत असल्याचे जाहीर केले आहे.यामुळे अगोदरच विठ्ठल ची बिले जमा करून, पोळा आणला देण्यात येणारा १०० रुपयाचा हप्ता आताच दिला आहे, अन् अशातच सांगोला कारखाना तून आता १०० रुपयाचा हप्ता देणार असल्याचे जाहीर केल्याने काळे यांना मोठी पंचाईत होऊन बसली आहे. त्यामुळे ही अनेक वर्षांची राजवट बाजूला सारावी असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले आहे. यावेळी डॉ बी. पी रोंगे सर, अमरजित पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय घोड़के, यांच्या अनेक मान्यवर मंडळी यांची भाषणे झाली.
दीपक पवार यांनी काटामारीचा दिला आकडेवारीत पुरावा
सहकार शिरोमणीचे निवडणुकीत मागील अनेक दिवसापासून दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.अशातच
मागील निवडणुकीत सत्ता मिळविल्यापासून काळे यांनी दरवर्षी किती काटा मारला हा काटा मारलेला ऊस नेमका कोणाच्या नावे टाकून बिल उचलले, त्यांना प्रत्यक्षात जमीन किती आहे. एवढी सखोल माहिती कारखान्यातून मिळविली असून ती माहिती थेट भाळवणी येथील बैठकीत मांडली आहे.यामुळे सभासद यांची चलबिचल वाढली आहे. याचा परिणाम म्हणून सत्तापरिवर्तन अटळ असल्याचेही दिपक पवार यांनी सांगितले.