पंढरपूर (प्रतिनिधी) :- गेली 25 वर्ष सातत्याने धडाडीने पत्रकारितेमध्ये कार्य करणारे उत्तम सुभाष अभंगराव यांचे राहत्या घरी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.
त्यांचे पत्रकारितेतील योगदान २५ वर्षाहून अधिक काळाचे आहे. मात्र झी वाहिनीच्या अल्फा मराठी या वृत्तवाहिनीवर काम करताना त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि परखड स्वभावामुळे तसेच सामाजिक कार्यात सातत्याने भाग घेण्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात वाढला होता.
दि. ६ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर पंढरपूर येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत