पंढरपूर (प्रतिनिधी) - सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही उतरण्याचे कारण म्हणजे की ऊस उत्पादक शेतकरीचें ऊस बीले तसेच कामगारांचे वेतने ही वेळेवर दिली गेली नाही. उसाला दर योग्यतो प्रमाणे न देता कमी दिला गेला. ऊस बिलासाठी शेतकरी सभासदांना एक एक वर्ष आपल्या मुलासाठी वाट पाहावी लागते ही अवस्था या सत्ताधारी संचालक मंडळाने केल्यामुळे आज हा सरकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत लोटलेला आहे. या सरकार शिरोमणी साखर कारखान्याला कर्जातून मुक्त करायचा असेल तर या ठिकाणी भाकरी परतली पाहिजे नाही तर ती भाकरी करपण्याची शक्यता असते. म्हणूनच आम्ही या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरलेलो आहोत यासाठी सहकार शिरोमणीत परीवर्तन होणारच अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या पत्रकार परिषदेमध्ये डॉ.बी.पी. रोंगेसर, ऍड. दीपक पवार, अमरजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की २९ हजार सभासद असताना हजारोंच्या संख्येने ऊस उत्पादक सभासदांचे नावे गाळून फक्त ११००० वर आणून ठेवलेली आहे. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सहकार शिरोमणी साखर कारखाना आमच्या ताब्यात दिल्यास २९००० सभासदांना आम्ही पुन्हा सभासद म्हणून सामावून घेणार आहोत असे ते म्हणाले .
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आम्ही सुरळीतपणे व्यवस्थितपणे चालू केल्यामुळे आज बाजारामध्ये व्यापारी वर्गामध्ये आमची पत निर्माण झालेली आहे. या भरोशावर आम्ही सहकार शिरोमणी साखर कारखाना व्यवस्थित चालवू तसेच ऊस उत्पादकांचे थकीत देणे व कामगारांची थकीत वेतने हे आम्ही या माध्यमातून देऊ असे देखील अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.