श्रीरंगलीला कथामृत समाजाला प्रेरणा देणारे - यशवंत भाऊ भोसले

0
श्रीरंगलीला कथामृत चरित्र प्रकाशित 

      निगडी (ता. कोरेगांव)  (प्रतिनीधी) - श्रीरंगलीला कथामृत या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस पुस्तकाचे लेखक गोपाळ चिमणाजी देशपांडे यांनी श्रीरंगलीला कथामृत यांचे कथारूप चरित्र प्रकाशित करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले, प्रमुख कीर्तनकार बापूसाहेब भोसले, रमाकांत बाळकृष्ण देशपांडे वेळापूर, श्रीपादराव गोविंदराव मनगोलीकर बार्शी, डॉ.सच्चिदानंद रंगनाथ गोसावी, ॲड.धनंजय शामसुंदर सिंहासने, ह.भ.प. सौ.वंदना मिलिंद कापरे, श्रीधर चिमणाजी देशपांडे हे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस उपस्थित होते.
     यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना श्रीरंगलीला कथामृत हे समाजाच्या उद्धारासाठी व समाजाला नवीन प्रेरणा देण्यासाठी उत्तम असे पुस्तक आहे. या श्रीक्षेत्र निगडी ता. कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी श्रीरंगनाथ स्वामींच्या मनोहर आश्वाच्या पायाचा खुराचा ठसा हे या श्रीक्षेत्र निगडीचे पुण्यत्व ज्यामुळे या ठिकाणी श्रीरंगनाथ स्वामींचा निवास झाला. गावकऱ्यांना त्यांचा सहवासही लाभला हे आमच्यासाठी पुण्याचेच आहे असा आम्हा सर्व गावकऱ्यांना अभिमान आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत श्रीधर चिमणाजी देशपांडे यांनी केले. तसेच श्रीरंगलीला कथामृत या पुस्तकाचे लेखक  गोपाळ चिमणाजी देशपांडे हे नाझरे येथील रंगनाथस्वामी व श्रीधरस्वामी यांच्या कुळात  जन्म झालेले. त्यांचे सर्व बालपण हे श्रीधर स्वामींच्या जन्मगृही गेले. त्यांचे संस्कार व त्यांच्या केलेल्या कार्याची महती ही सर्वांपर्यंत पोहोचावे हा विचार ठेवून त्यांनी श्रीरंगलीला कथामृत सर्वांना परिचयाचे व्हावे असा विश्वास ठेवून त्यांनी पुस्तक लिहिले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह. भ. प. सौ. वंदना कापरे यांचं सुमधुर किर्तन झालं या कीर्तनामध्ये त्यांनी श्रीरंगनाथ स्वामी त्यांचे जीवन कार्य स्वतःच्या ओवीबद्ध लेखणीतून कीर्तनातून त्यांनी सर्व श्रोत्यांसमोर मांडले. या कार्यक्रमासाठी नाझरे तालुका सांगोला तसेच नाझरेकर सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोसावी यांनी केले व त्यानंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)