पंढरपूर, दि.05 (उमाका) :- आषाढीवारीमध्ये डायल 108 च्या एकूण 75 अॅम्ब्युलन्स कार्यरत होत्या. त्यासाठी ईओसी(कंट्रोल रुम) पुण्याच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती. त्याव्दारे पंढरपूरातील सर्व भाविकांना 24 तास मोफत सेवा दिली गेली. मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम वारंवार येत असल्यामुळे यावर्षी सेवा लवकरात लवकर मिळावी, यासाठी वॉकीटॉकीची सुविधा सर्व अॅम्ब्युलन्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. पंढरपूरात अद्यावत असणारी कंट्रोल रुम , वॉकीटॉकी सुविधा, जिओ मेपींग या सर्व गोष्टीमुळे 108 अॅब्बयुलन्स वारकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली.
आषाढी यात्रेत यावर्षी गंभीर स्वरुपाच्या 847 रुग्णांना व किरकोळ आजार असणाऱ्या 19 हजार 06 रुग्णांना सेवा देण्यात आली. एकूण 19 हजार 853 रुग्णांनी 108 या मोफत अॅम्ब्युलन्स सेवा देण्यात आली. महाआरोग्य शिबीरातील अतिंगभीर अशा 82 व किरकोळ 1 हजार 567 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. एकूण 21 हजार 312 रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली आहे.
आषाढी यात्रेचा सांगता समारोप दि. 3 जुलै 2023 रोजी प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आला. वारीमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व पायलट व कंट्रोल रुममधील सर्व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून यथोचित सन्मान करण्यात आला. या समारंभास प्रांताधिकारी अशोक घोडके, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाध बोधले, उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेशकुमार माने, डॉ. प्रसन्न भातलवंडे, बीव्हिजी चे झोनल मॅनेजर विठ्ठल बेळके, पुणे जिल्हा व्यवस्थापक प्रियंका जावळे, सातारा जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कदम, सांगली जिल्हा व्यवस्थापक कौस्तुभ घाटुळे, सोलापूर जिल्हा व्यवस्थापक अनिल काळे, तसेच सर्व एडीएम, इएमइसओ(डॉक्टर), पायलट कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वैभव जिंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल काळे यांनी केले