पंढरपूर, दि.19 (उमाका) :- सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्याादेत पदे भरण्याबाबतचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 11 सजातील पदे रिक्त आहेत. या कोतवाल भरतीची आरक्षण सोडत प्रांताधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष गजानन गुरव यांच्या उपस्थित तहसिल कार्यालय पंढरपूर येथे गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता काढण्यात येणार असल्याचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यामध्ये एकूण 53 सजे मंजूर असून एका सजास एक कोतवाल प्रमाणे 42 कोतवाल कार्यरत आहेत. तर पंढरपूर तालुक्यातील 11 सजांमधील कोतवाल पदे रिक्त आहेत. यामध्ये गोपाळपूर, अनवली, गुरसाळे, गादेगाव,गार्डी, बोहाळी,कौठाळी, ईश्वरवठार, पटवर्धन कुरोली, सांगवी, आणि करकंब सजांचा समावेश आहे. रिक्त 11 कोतवाल पदांपैकी शासन आदेशान्यवे 80 टक्के पदे भरावयाची असल्याने पंढरपूर तालुक्यात 11 रिक्त पदांपैकी 9 सजाचे ठिकाणी कोतवाल पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
संबधित सजाचे आरक्षण सोडतीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, मान्यवर पदाधिकारी तसेच संबधित गावच्या ग्रामस्थानी उपस्थित रहावे आवाहन तहसिलदार तथा कोतवाल निवड समितीचे सचिव सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.