भाळवणी दि.11:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि, चंद्रभागानगर, पो.भाळवणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर या कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक 2023 ते 2028 प्रक्रिया पुर्ण झाली असुन जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक(साखर), सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.20/6/2023 रोजी काढलेल्या अधिसुचनेनुसार मा.श्री. भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती. सदर नेमणुक आदेशान्वये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंगळवार दि.11/7/2023 रोजी सकाळी 11:00 मा.संचालक मंडळाची पहिली सभा बोलावण्यात आली होती. सदर सभेमध्ये चेअरमन पदासाठी कल्याणराव वसंतराव काळे व व्हा.चेअरमन पदासाठी भारत सोपान कोळेकर यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमनपदी कल्याणराव काळे व व्हा.चेअरमनपदी भारत कोळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी जिल्हा निवडणूक कार्यालयाचे नायब तहसिलदार परदेशीमठ, अव्व्ल कारकुन शेख व नाईक शंतनु गायकवाड हे उपस्थित होते तसेच कारखान्याचे माजी संचालक व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सत्कार मा.चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच इतर मान्यवरांचाही सत्कार कारखान्याचे संचालक यांनी केला.
यावेळी कारखान्याचे मा.चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भागातील 2022-23 मध्ये ज्या ऊस शेतक-यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे त्यांची बिले लवकरात लवकर देण्यात संचालक मंडळ कटिबध्द् आहे. तसेच 2023-24 चा हंगाम सुरु करणेचे द्ष्टीने कराराप्रमाणे तोडणी वाहतुक यंत्रणेस पहिला हप्ता दिला जाईल तसेच कारखान्याचे कामगारांना देय असलेली पगार रक्क्म अदा करुन कारखाना चालु हंगामात उत्कृष्टपणे चालविणेचा संचालक मंडळाचा मानस आहे. जोपर्यंत वरील गोष्टींची पुर्तता करीत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा सत्कार स्विकारणार नाही असे त्यांनी सांगितले..
याप्रसंगी महाराष्ट्र् लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कारखान्याचे इंजिनिअरींग विभागाचे कामगार शिवमुर्ती रघुनाथ पवार यांचा मुलगा निशांत शिवमुर्ती पवार व भाळवणी गावचे सुपुत्र निरंजन नवनाथ देशमुख यांची पीएसआय पदी निवड झाल्याने कारखान्याचे चेअरमन यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग कौलगे, राजाराम माने, मारुती भोसले, इब्राहीम मुजावर, माजी नगरसेवक शकुर बागवान, जिल्हा शिवसेना प्रमुख साईनाथ अभंगराव, शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे, नितिन बागल, प्रतिभा पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव देठे, विठठल कारखान्याचे संचालक समाधान काळे, विलास काळे, डॉ.शिनगारे, प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन विष्णू यलमार, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजीबापू साळुंखे, नारायण शिंदे, रणजित जाधव, उत्तम काका नाईकनवरे, मोहन उपासे व भागातील कार्यकर्ते तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डे.जनरल मॅनेजर कैलास कदम, खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.