पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या महारुद्र गारमेंट्स यांच्या वतीने मुद्रक बांधवांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना महारूद्र गारमेंटचे मालक हेमंत कुलकर्णी म्हणाले- मी प्रिंटिंग व्यवसाय 2004 साली पंढरपूरात सुरू केला. प्रिंटिंग व्यवसाय करत असतानाच टी शर्ट, इलेक्शनचे झेंडे, पक्षाचे चिन्ह असलेले गमजे व कापडावरील प्रिंटिंग कोणीही करत नाही. हे लक्षात आल्यावर मी महारुद्र गारमेंट्स या व्यवसायाची माहिती घेऊन हा व्यवसाय सुरूवातीला अगदी छोट्या प्रमाणात चालू केला.रेडीमेड माल आणून त्यावर प्रिंटिंग करत होतो पण त्यातही नफा कमी राहात होता. मग अनेक ठिकाणची माहिती घेऊन व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यातही अनेक अडचणी होत्या कापडातील अनेक व्हरायटी होत्या,चांगले कापड घ्यावे तर त्यांचा दर जास्त होत होता.त्यामुळे ग्राहकाला माल देताना दर जास्त होत होता. मग बाहेरच्या दराची स्पर्धा येथेही होऊ लागली.म्हणून आपण प्रॉडक्शन मध्ये उतरावे म्हणून प्रयत्न सुरू केला. सुरूवातीला शिलाई मशिन घेतल्या, होलसेल मटेरियल मोठ्या प्रमाणात खरेदी केले.पण यासाठी कामगाराची समस्या भेडसावू लागली मग येथे काम मागणार्या लेडिजला कामगाराला 4-5 महिन्याचे ट्रेनिंग द्यावे लागले.ट्रेनिंग दिल्यानंतरही कामगार कायम काम करतील यांची खात्री नव्हती.टी शर्ट साठी कटिंग मास्टरची समस्याही होती पण यात माझी पत्नी सौ.मेघा कुलकर्णी यांनी कटिंगचे पुर्ण काम शिकून आज रोज लागणार्या टीशर्टचे कटिंगचे सर्व काम करू लागली.त्यामुळे या व्यवसायातील महत्वाचे कामाची जबाबदारी सौ.मेघा कुलकर्णी यांनी पार पाडली.आज जवळपास 20 शिलाई मशिनवर शिलाईचे काम चालू असते. त्या सर्व कामगारांना कापड कट करून द्यायचे काम त्या स्वत: करत असतात.अशा पध्दतीने या व्यवसायाचा पाया रोवला गेला.
या व्यवसायात अनेक प्रकारचे कापड तर आहेच पण रोज नवीन नवीन प्रिंटिंग मध्ये बदल होत आहेत. यामध्येेेे सब्लीेमेशन प्रिंटिंग, डी टी एफ प्रिंटिंग, स्क्रिन प्रिंटिंग, रबर प्रिंटीग, नाईट ग्लो प्रिंटींग, रेग्युलर रिप्लेक्टर प्रिंटिंग, रेनबो रिफ्लॅक्टीव प्रिंटिंग इ.प्रकारचे प्रिंटींग अत्याधुनिक मशीनवर कमीत कमी वेळात आपण दिलेल्या साईज व नमुन्याप्रमाणे करून दिले जाते.
यावेळी हेमंत कुलकर्णी यांनी सर्व माहिती मुद्रक बांधवांना सांगून आपल्या व्यवसायाची प्रगती सांगितली व आलेल्या सर्व मुद्रकांना एक टी शर्ट भेट म्हणून दिला तसेच त्यांनी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली
सदर प्रसंगी मुद्रक संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष बबन सुरवसे, सचिव रामकृष्ण बिडकर, खजिनदार श्रीराम रसाळ, सहसचिव मकरंद वैद्य, सहखजिनदार संतोष गोंजारी, प्रसिध्दी प्रमुख, प्रदीप भोरकर, मंदार केसकर, गणेश बागडे, , शिवम पाटील, संजय खासनीस, रमेश यादव ,शितल कोठारी , धनंजय उखळे, गणेश दुरूगकर, श्रीनाथ साळुंखे, अदित्य आलाट, विशाल पावले, अमोल चव्हाण, दादा माळी, सर्व सभासद व मुद्रक यावेळी उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक मंदार केसकर यांनी तर आभार प्रदर्शन रामकृष्ण बिडकर यांनी केले.