पंढरपूर (प्रतिनिधी) - कर्मयोगी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या; पंढरपूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली.
सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठीची चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची निवड आज रोजी निवडणुक निर्णय अधिकारी सांगोलकर यांचे अध्यक्षतेखाली पार पाडली. यामध्ये नुतन चेअरमनपदी सुधीर गजानन भाळवणकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश ज्ञानोबा गाजरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करणेत आली.
संस्थेने २० व्या वर्षात पदार्पण केले निमित्त दिनांक १८.०७. २०२३ पासुन सभासद व ठेवीदार यांचे सोयीसाठी सायंकाळी ६ ते १० 'वाजेपर्यंत रोख भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करणेत आली आहे. त्याचे उदघाटन संस्थापक उमेशजी परिचारक यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी युटोपियन शुगर्सचे चेअरमन व संस्थापक उमेशजी परिचारक तसेच तज्ञ संचालक सी. एन. देशपांडे तसेच यावेळी नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व नुतन संचालक, सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते.