पंढरपुर (प्रतिनिधी) - पंढरपुर तालुका, पंढरपुर शहर, सांगोला, मिरज ग्रामीण जि सांगली, सोलापुर शहर पोलीस ठाणे हददीमध्ये गर्दी, मारामारी, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणी करणे, वाळु चोरी, अपहरण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, चोरी, जबरी चोरी करणे, घरात घुसून मारहाण करणे, सरकारी नोकरावर हल्ले करणे यासारखे गंभीर गुन्हे करून समाजामध्ये अशांतता व दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत करून दहशत माजविणारे टोळीप्रमुख १) प्रतिक उर्फ बबलु हरिभाउ प्रक्षाळे वय ३२ वर्षे, रा. भटुंबरे ता. पंढरपूर जि सोलापुर व टोळीसदय २) सोमनाथ दिगंबर खंकाळ, वय ३९ वर्षे, रा. गणेश नर्सरी जवळ, गजानन नगर, पंढरपूर ता. पंढरपूर जि सोलापुर ३) निखील कृष्णा राजुरकर, वय ३२ वर्षे रा. हणुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ४) रविंद्र हरिभाउ गुरव वय ४२ वर्षे, रा. रूक्मिणी विद्यापीठ शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ५) विक्रांत दशरथ माने रा. पंढरपूर जि. सोलापूर यांचेविरूध्द मा. श्री. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, मा. श्री. हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद बी पाटील पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी मोका प्रस्ताव तयार करून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाचे (मोका) कायदयाअंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्याची मंजुरी मिळालेवर सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. डॉ. श्री. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग यांनी करून यातील टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचेविरुध्द अंतिम दोषारोपपत्र पाठविण्याची मा. अपर पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य मुंबई यांची अंतिम मंजुरी घेवुन वरील टोळीप्रमुख व टोळीसदस्य यांचेविरूध्द मा. दोषारोपपत्र सादर केले असुन, सदर टोळीतील पाहिजे असलेले टोळीसदस्य १) निखील कृष्णा राजुरकर, वय ३२ वर्षे रा. हणुमान नगर, टाकळी रोड, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर २) रविंद्र हरिभाऊ गुरव व ४२ वर्षे, रा. रूक्मिणी विद्यापीठ शेजारी, रेल्वे स्टेशन जवळ, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापुर ३) विक्रांत दशरथ माने रा. पढरपूर जि. सोलापूर हे फरारी असुन त्यांचा शोध घेण्याचे काम चालु आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, मा. श्री. हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मा. डॉ. श्री. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर उपविभाग, पोलीस निरीक्षक मिलींद बी पाटील पंढरपुर तालुका पोलीस ठाणे, वाचक पोसई/हमीद शेख, पोहेकॉ / ३६४ शिवाजी पाटील, पोना / ८९४ सचिन तांबिले, पोकॉ/ राहुल लोंढे यांनी केलेली आहे.