सर्व नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी ३१ जुलै २०२३ रोजी विधानभवनावर भव्य मोर्चा

0
सोलापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक ३१ जुलै २०२३ नगरपंचायत व नगरपरिषद व संवर्ग  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील  सर्व कर्मचारी विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात करण्यात येणार असून या आंदोलनाची तयार करणे  कामी लाल बावटा कार्यालय सोलापूर येथे  महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटू चे राज्याचे सचिव कॉ. एम एच शेख, जिल्हाध्यक्ष कॉ.सिद्धाप्पा  कलशेट्टी, महादेव आदापुरे,धनराज कांबळे, महादेव कांबळे, राम पवार,प्रदीप शिंदे, तुकाराम पायगन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील १४  नगरपालिकेचे कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी  उपस्थितीत होते.
          यावेळी बोलताना राज्याचे सचिव अँड. सुनील वाळूजकर यांनी सांगितले की, संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक डॉ. डी. एल. कराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत मंत्रालयात संघर्ष समिती बरोबर  दिनांक २० मार्च २०२३ रोजी झालेल्या चर्चेनुसार अनेक मागण्या मान्य होऊनही त्यावर अद्याप पर्यंत कार्यवाही झालेली नाही या मागण्या मध्ये महाराष्ट्रातील  सर्व नगरपालिका कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला १००% वेतन शालांत सेवार्थ च्या धर्तीवर कोषागार मार्फत द्यावे, तसेच १०.२०.३० वर्ष सेवा झालेल्या कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा त्वरित  लाभ देणे कामी आदेश काढावा .  सातवा वेतन आयोगाची फरकाची चौथा हप्ते द्यावा. नवीन झालेल्या नगरपंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे. नवीन नगरपंचायत मधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध मध्ये पदनिर्मिती करावी व त्वरित समावेशन करावे नगरपंचायती मधील उद्घोघोषने पूर्वीचे व उद्घोघोषनेनंतर असलेल्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे तसेच नगरपंचायत मधील सेवेत असताना  मयत  झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने अथवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी. . हंगामी व ठेकेदार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन याप्रमाणे वेतन अदा करावे व सेवेत कायम करावे,सफाई कामगार यांची लाड बर्वे मलकानी कमिटीच्या शिफारशी नुसार वारसा हक्काने त्वरित नियुक्ती द्यावी तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे चालू असलेल्या दाव्यामध्ये लवकरात लवकर निर्णय करून घेऊन सफाई कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची पदे त्वरित भरावीत व गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपा भरती त्वरित करावी. २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. नगर परिषदेमधील LSGD व LGS झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढी द्याव्यात. नगरपरिषद नगरपंचायत मधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे द्यावीत स्वच्छता निरीक्षक यांना पदोन्नती द्यावी व जॉब चार्ट तयार करण्यात यावा. वर्षानुवर्षी काम करत असलेल्या नगरपरिषद लिपिक कर्मचारी व सफाई कर्मचारी यांना रिक्त पदांवर  पदोन्नती द्यावी व इतर विविध मागण्यासाठी मुंबई येथे विधान भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनामध्ये यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ४०० नगरपालिका नगरपंचायत मधील एक लाख कर्मचारी  सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे मुख्य संघटक व राज्याची जनरल अँड.सुनिल वाळूजकर   व जिल्हाध्यक्ष कॉ  सिद्धाप्पा कलशेट्टी यांनी दिली. यावेळी  प्रदीप शिंदे, संतोष सर्वगोड,प्रितम येळे ,बाबासाहेब पवार, दत्तात्रय कुर्डे,  खाजाप्पा दादानवरू,योगेश घंटे, इम्रान शेख, वैभव भोरकडे नंदकुमार बनकर,विठ्ठल कांबळे व इतर सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)