अवैध वाळू उपसा करणा-या वाळु माफियांवर कारवाई करणेसाठी गेलेल्या महसुल विभागाच्या कर्मचारी यांना सहकार्य करणा-या खाजगी इसमास केली गंभीर मारहाण, पंढरपुर शहर पोलीसांनी मारहाण करणा-या सराईत ४ गुन्हेगारांवर केली अटकेची कारवाई
पंढरपूर (प्रतिनिधी) - दि. ०९/०७/२०२३ रोजी रात्रौ १०/३० वा. चे सुमारास जॅकवेल, इसबावी, पंढरपुर येथे महसुल विभागाचे कर्मचारी यांनी अवैध वाळु वाहतुक करणारे चारचाकी वाहन कारवाई करीता पकडले असता व सदरचे वाहन हे पुढील कारवाईकरीता शासकीय गोडाउन येथे नेणेकरीता महसुल विभागाच्या कर्मचारी यांनी खाजगी इसम पांडुरंग रमाकांत कुलकर्णी वय ४८ व्यवसाय चालक रा. सोलापुरे नगर, टाकळी रोड पंढरपुर यांना जॅकवेल पंढरपुर येथे मदतीकरीता बोलावले असता सदर खाजगी इसम हा मदतीकरीता दुचाकीवर कारवाई ठिकाणी येत असताना रस्त्यात निर्मनुष्य ठिकाणी आडवून महसुल खात्यांच्या लोकांना आमची वाळु पकडुन देण्यास मदत करतो काय ? तुझा आता परफेक्ट कार्यक्रम करतो, असे म्हणुन आरोपी नामे १) विकी मधुकर मेटकरी रा. पंढरपुर २) महेश तानाजी शिंदे रा. इसबावी, पंढरपुर ३) पृथ्वीराज उर्फ रेडडी रामहरी चव्हाण रा. अनवली ता. पंढरपुर ४) सुहास उर्फ भैय्या मायाप्पा काळे रा.बोहाळी ता. पंढरपुर यांनी संगनमत करून आरोपी नं ०१ व ०२ याचे सांगणेवरून आरोपी नं ३ व ४ यांनी पांडुरंग रमाकांत कुलकर्णी यांना डोकयावर, कमरेवर, पायावर दगड व फरशीने गंभीर जखमी करून मारहाण केली. सदर मारहाणीत जबर मार लागलेने जखमी हा बेशुध्दावस्थेत कंडरे तालीम चौकाचे जवळील रस्त्यावर पडले होते ते दुस-या दिवशी सकाळी शुध्दीवर आलेने त्यांना लाईफलाईन हॉस्पीटल पंढरपुर येथे उपचारीकरीता महसुल विभागाचे कर्मचारी यांनी दाखल केले होते. त्याअनुशंगाने वरील आरोपीतांविरूध्द दि. १४/०७/२०२३ रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ४५२ / २०२३ भादवि कलम ३२६, ३२३, ३४१, १०९, ११४,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर आरोपीतांना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे शिताफिने ताब्यात घेवुन अटक करून जेरबंद केले. सदर आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी मा. न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपितांना ०६ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केले असुन पुढील तपास सुरू आहे
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. अर्जुन भोसले सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. अरुण फुगे सो यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पालीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, सपोफौ नागनाथ कदम, राजेश गोसावी, पोह शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, इरफान मुलाणी पोलीस नाईक सचिन इंगळे, प्रसाद औटी, सुनिल बनसोडे, शोएब पठाण, सचिन हॅबाडे, दादा माने, राकेश लोहार, शहाजी मंडले, समाधान माने यांनी केली आहे.