पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरातील सभा मंडपात विविध संतांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. मात्र या ठिकाणी नाभिक समाजाचे थोर संत श्रीसेना महाराज यांचे तैलचित्र लावण्यात आलेले नव्हते यासाठी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्यावतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना निवेदन देऊन संत सेना महाराज यांचे तैलचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती
परंतु आज यावेळी मंदिर समिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके साहेब व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये सदरचा प्रस्ताव ठेवून श्रीसंत सेना महाराज यांचे तैलचित्र बसविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने सर्व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी आमचे मार्गदर्शक ह. भ. प. बबन काका शेटे राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेचे शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण, राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश संघटक जितेंद्र भोसले राष्ट्रीय नाभिक युवक संघटना कार्याध्यक्ष मनोज गावटे किशोर भाऊ भोसले बारा बलुतेदार संघटना अध्यक्ष शिवबा काशीद उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रीतम भोसले विजय भोसले, प्रमोद लाडगावकर, महेश माने, दत्ता काळे, चंद्रकांत खंडागळे, अंकुश भोसले, विठ्ठल भोसले, श्री खंडागळे, दत्ता देवकर, गुरू राऊत, यांच्यासह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.