पंढरपूर (प्रतिनिधी) -- पंढरपूर येथील लोकमान्य सोसायटी पंढरपूर शाखेचा स्थलांतरीत उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सकाळी आकरा वाजता लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सोसायटी लि.चे संस्थापक अध्यक्ष तसेच तरूण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व माजी आमदार , कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सोसायटी लि. हि बैकींग क्षेत्रातील संस्था गेली दोन दशकाहून अधिक काळ कार्यरत असून संस्थेच्या महाराष्ट्र राज्यासह चार राज्यामध्ये २१३ शाखांचा विस्तार आहे. लोकमान्यकडून शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना नेहमीच प्रधान्य देण्यात येते. ग्राहकांच्या हिताचा विचार सर्वात आधी केला जातो. त्यामुळेच लोकमान्य जनसामान्यांची बँक ठरली आहे.
या बँकेच्या पंढरपूर येथील शाखेचा स्थलांतरीत उद्घाटन सोहळा शुक्रवार दि.२८ रोजी पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथील सुरवसे बिल्डींग येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे अवाहन लोकमान्य सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.