पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राजेंद्र बबन तथा आर.बी.जाधव तर व्हा.चेअरमनपदी सतीश लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व निशिगंध सहकारी बँकेचे माजी चेअरमन मार्गदर्शक कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये प्राधिकृत अधिकारी पी.सी. दूरगुडे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर केली .
यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री भानुदास सावंत, डॉ.मंदार सोनवणे, सतीश लाड, महेश पटवर्धन, वैभव साळुंखे, Adv. क्रांती कदम, शोभा येडगे, देविदास सावंत, भागवत चवरे, सरव्यवस्थापक कैलास शिर्के, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.