खादी ग्रामोद्योग आयोग व सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून पंढरीत ३०० महिलांना मिळाला रोजगार
July 20, 2023
0
तिसंगी येथे अगरबत्ती प्रशिक्षण शिबिर
ना.डॉ. रामदासजी आठवले युवा मंच व खादी ग्रामोद्योग आयोगाचा उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) - खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार रामदासजी आठवले युवा मंच यांच्यावतीने ग्राम उद्योग विकास योजना अगरबत्ती आत्मनिर्भर मिशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरपीआयचे नेते दीपक चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे दिनांक १९ जुलै ते २८ जुलै २०२३ या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार पंडित कोळी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई नोडल ऑफिसर अरुण कुमार यादव, प्रताप शिंदे, मा. सहसंचालक सुरेश शिवशरण, मिस्टर ट्रेनर दिनेश मिस्त्री, रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, डॉ. सुभाष कदम, एडवोकेट महेश कसबे, प्रमोद थिटे, बाळासाहेब आहेरकर, पांडुरंग शिंदे, बुद्धभूषण चंदनशिवे, हर्षद काळे, महेश शेवाळे, पृथ्वीराज शेवाळे, प्रकाश सोनवणे, हनुमंत चंदनशिवे, अनिल चंदनशिवे आदी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मागील काही महिन्यांपूर्वी मा. खा रामदासजी आठवले युवा मंचच्या वतीने पंढरपूर येथे उद्योग जनजागृती शिबिराच्या माध्यमातून सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत शिबिराचे आयोजन करून बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा मानस आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांनी व्यक्त केला होता.
यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी पाठपुरावा करून २० अगरबत्ती तयार करण्याचे मशीन उपलब्ध करून देऊन सुमारे ३०० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक १९ जुलै ते २८ जुलै २०२३ या कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मुंबई येथील प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत.
या उपक्रमांतर्गत बेरोजगार महिलांना रोजगार मिळणार असून पुढील काळात सर्व घटकातील नागरिकांना उद्योगासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आरपीआयचे दीपक चंदनशिवे यांनी दिली.
Tags