आषाढी यात्रेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विशेष सन्मान
पंढरपूर (प्रतिनीधी) : पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये काम करीत असलेले पोलीस कर्मचारी यांनी यात्रा कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा मंदिरे समितीच्या वतीने सत्कार पर सन्मान करण्यात आला.
पंढरपुरातील काही पोलीस कर्मचारी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीत आपली सेवा बजावीत आहेत. त्याचबरोबर ते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, महा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मंदिर समितीचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना योग्य मार्गदर्शन करणे, मंदिर व भाविक सुरक्षितेच्या बाबतीत सतत चर्चा करणे, गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शन करून योग्य नियोजन करणे इत्यादी कामे केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, पो. मनेरी, पोलीस हवलदार शेटे, पोलीस हवालदार तावसे, पोसई वाघमारे ,पोलीस हवालदार रासकर या सर्व पोलीसांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भगवे उपरणे, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पोलीस भावांचा सन्मान केल्याबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.