मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याला मुदतवाढ द्या - प्रशांत परिचारक

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना फक्त एक रूपयात भरण्याची प्रकीया सुरू आहे. या योजनेस शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पिकविम्यासाठी ऑनलाईन अपलोड करतेवेळी सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकरी पिकविम्याच्या नोंदणीपासून वंचित राहत आहेत.

सदर पिक विम्याची मुदत ही ३१ जुलै रोजी संपणार असून तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांची नोंदणी पुर्ण होऊ शकणार नाही. त्या अनुषंगाने कृषीमंत्री धनंजय मुंडे व मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी यांच्याशी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी फोनद्वारे चर्चा केली. पीकविम्या संदर्भातील अडचणी दुरू कराव्यात व मुदतवाढ मिळणेसाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात अश्या पद्धतीची मागणी परिचारक यांनी यावेळी केली.

त्या अनुषंगाने पंतप्रधान पीकविमा योजना सर्व सामान्य शेतकरी तसेच शेवटच्या घटकांतील शेतकऱ्यांपर्यंत नोंदणी घेण्याच्या सुचना मुंढे यांनी अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती प्रशांत परिचारक यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)