करकंब येथे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग
लाखों रुपयांचे नुकसान
करकंब (प्रतिनिधी) :- येथील जळोली रोड लगत असलेल्या झिरपे कुटुंबीयांच्या ऊसाला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत अंदाजे 5 ते 6 एकर ऊसासह ठिबकचे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक करकंब - जळोली रोड लगत सु.रा.परिचारक शाळेच्या पाठीमागे असलेल्या बजरंग झिरपे व प्रसन्न झिरपे यांच्या ऊसाला आग लागली.ऊसाच्या वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. एकूण साडे आठ एकर ऊसापैकी सुमारे 5 ते 6 एकर ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच यामधील ठिबकसंच संपूर्ण जळून खाक झाले आहेत. गावातील अनेक नागरिकांनी आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.करकंब पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली. विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखाना व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे आग आटोक्यात आली.